Nashik Dengue News: शहरात डेंगीने एकाचा मृत्यू

ahmednagar district dengue 225 infected  584 suspected health marathi news
ahmednagar district dengue 225 infected 584 suspected health marathi newsSakal
Updated on

Nashik Dengue News : शहरात डेंगीमुळे नाशिक रोड आनंदनगर भागातील एका व्यावसायिकाचा मृत्यू झाला आहे. या वर्षात डेंगीचा पहिला बळी ठरला आहे.

डेंगी संशयितांचे तीन अहवाल रक्ततपासणी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. त्यातील दोन अहवाल निगेटिव्ह आले. (One person died of dengue in city nashik news)

शहरात डेंगी रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ऑक्टोबरमध्ये डेंगीचे १९३ रुग्ण आढळले होते. यात नाशिक रोड येथील आनंदनगर परिसरातील एक व्यावसायिक, सिडकोतील कर्मयोगीनगर परिसरातील दंत शल्यचिकित्सक व आनंदवल्ली येथील एका संशयितांचा मृत्यू झाला.

या रुग्णांचे रक्तनमुने तपासणीसाठी पाठविले होते. तीन अहवाल महापालिकेला प्राप्त झाले. त्यात नाशिक रोड येथील मृत्यू डेंगीने झाल्याचे निष्पन्न झाले. आनंदनगर भागात महापालिकेच्या वैद्यकीय विभागामार्फत रुग्ण तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. ७० नागरिकांचे रक्त नमुने चाचणीसाठी घेण्यात आले.

ahmednagar district dengue 225 infected  584 suspected health marathi news
Dengue mosquito : डेंगी वाहक डासांच्या अंड्यांचे गूूढ उकलले

दरम्यान महापालिकेच्या वैद्यकीय विभागामार्फत प्रतिदिन दररोज शंभर डेंगी संशयितांचे रक्तनमुने प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविले जात आहे. नमुन्यांची संख्या सातत्याने वाढतं आहे. सध्या प्रयोगशाळेकडे तीनशे अहवाल प्रलंबित आहे. शहरात आतापर्यंत ७१५ रुग्णांना डेंगीची लागण झाल्याचे अहवालात नमुद आहे.

ahmednagar district dengue 225 infected  584 suspected health marathi news
Nashik Dengue Disease: डेंगी थैमानानंतर महापालिका यंत्रणेला जाग; कर्मचाऱ्‍यांना उपाययोजनांच्या सूचना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.