बळीराजाला दिलासा! बाजारात कांदा, लसणाचे भाव वधारले

शरदचंद्रजी पवार मार्केट यार्डात झालेल्या लिलावात उन्हाळकांद्याची तीन हजार ५२५ क्विंटल, लसूण ३३ क्विंटल आवक झाली.
Onion and garlic
Onion and garlice-sakal
Updated on

म्हसरूळ (जि. नाशिक) : शरदचंद्रजी पवार मार्केट यार्डात मंगळवारी (ता. ४) झालेल्या लिलावात उन्हाळ कांद्याला एक हजार ४५०, तर लसणाला नऊ हजार रुपये कमाल बाजारभाव मिळाला. यामुळे शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला. (Onion and garlic prices rose In Market)

आवकही वाढली

पेठ रोडवरील शरदचंद्रजी मार्केट यार्डातील कांदा-बटाटा विभागात कळवण, वणी, पिंपळवाडी, पाळे, मानूर, नांदुरी, सिन्नर, ठाणगाव, पाडळी, पेठ, हरसूल, करंजली, कोल्हार आदी भागांतून कांदा आवक होतो. मंगळवारी दुपारी कांदा लिलाव झाला. यात उन्हाळ कांद्यास किमान ६५०, कमाल एक हजार ४५०, तर सर्वसाधारण एक हजार १०० रुपये बाजारभाव मिळाला. लसणास किमान चार हजार ४७००, कमाल नऊ हजार, तर सर्वसाधारण सात हजार ५०० रुपये बाजारभाव मिळाला. कांद्याची आवक तीन हजार ५२५ क्विंटल, लसूण ३३ क्विंटल आवक झाली.

Onion and garlic
मराठा आरक्षण देण्याची युक्ती चुकली, पाहा व्हिडिओ
Onion and garlic
रेमडेसिवीर इंजेक्शन न घेता 86 वर्षांच्या आजोबांनी हरविले कोरोनाला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.