लासलगाव बाजार समितीत महिला संस्थेची गळचेपी?

lasalgaon onion auction
lasalgaon onion auctionesakal
Updated on

लासलगाव (जि.नाशिक) : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (lasalgaon onion market) आवारात गुरुवारी (ता. ३) ‘नाफेड’कडून (nafed) कांदा खरेदीसाठी नेमलेल्या विंचूरच्या कृषी साधना शेतमाल उत्पादक सहकारी संस्थेने लिलाव प्रक्रियेत सहभाग घेतला. त्यास लासलगाव व्यापारी वर्गाने विरोध दर्शवत लिलाव प्रक्रियेतून काढता पाय घेतल्याने सकाळच्या सत्रातील लिलाव बंद पडले. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड हाल झाले.(Onion-auction-stalled-at-Lasalgaon-market-committee-nashik-marathi-news)

महिला संस्थेची कांदा खरेदीसाठी गळचेपी?

आशिया खंडातील कांद्याची अग्रेसर बाजार समिती म्हणून नावलौकिक असलेल्या लासलगाव बाजार समितीत महिला सभापती आणि उपसभापती असताना महिला संस्थेची कांदा खरेदीसाठी गळचेपी होत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. तर विंचूर येथील कृषी साधना महिला शेतकरी संस्था ही कांदा व्यापारी असोसिएशनची सभासद नसल्याने कांदा लिलावातून काढता पाय घेतल्याने कांदा व्यापाऱ्यांच्या या आडमुठ्या भूमिकेमुळे कांद्याचे लिलाव ठप्प झाले, असे समजते.

महिला संस्था असोसिएशनची सभासद नाही म्हणून...

विंचूर येथील कृषी साधना महिला शेतकरी संस्था ही नाफेडसाठी कांदा खरेदीला उतरली असता, ही संस्था लासलगाव कांदा व्यापारी असोसिएशनचे सभासद नसल्याने कांदा व्यापाऱ्यांनी लिलावातून सहभाग काढून घेतल्याने कांद्याचे लिलाव ठप्प झाले. कांदा लिलाव बंद पडल्याने शेतकरी आक्रमक होत लिलाव पूर्ववत सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी बाजार समिती प्रशासनाकडे केली. विंचूर येथील संस्था लासलगाव बाजार समितीची परवानाधारक आहे. पण, लासलगाव व्यापारी असोसिएशनची सभासद नसल्याचे कारण देत व्यापारी वर्गाच्या आडमुठे धोरणामुळे कांद्याचे लिलाव दुपारपर्यंत ठप्प झाले. या वेळी कांदा लिलाव पूर्ववत सुरू करण्याच्या मागणीला लासलगाव बाजार समितीने काही काळ शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे शेतकरी वर्गात प्रचंड संताप निर्माण झाला. दरम्यान, दुपारी साडेतीनला लिलाव प्रक्रियेला सुरवात झाली.

दरम्यान, आम्हालाही नाफेडने कांदा खरेदीची परवानगी दिल्याचे ‘वेफको’ या संस्थेने कळवले. यावर बाजार समितीने वेफको व विंचूर येथील संस्थेला कागदपत्रांची पूर्तता करण्यास सांगून ज्याला परवानगी दिली असेल, त्या संस्थेला लिलाव प्रक्रियेत सहभाग घेता येईल, यावर तोडगा निघाल्याने व्यापाऱ्यांनी दुपारच्या सत्रात लिलाव सुरू झाले. .

lasalgaon onion auction
‘नो बेड...’ ‘नो रेमडेसिव्हिर...’ ‘नो व्हेंटिलेटर...’

गेल्या वर्षी केंद्र सरकारने आधारभूत किंमत योजनेंतर्गत ४ मे २०२० ला ५ ऑगस्टपर्यंत ३१ हजार ६९४ क्विंटल कांदा खरेदी केला होता. हा कांदा कमीत कमी ५३२ रुपये, जास्तीत जास्त एक हजार १८७ रुपये, तर सरासरी ९५० रुपये दराने खरेदी केला होता. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्‍या लाटेमुळे ही योजना तब्बल एक महिना उशिराने सुरू झाल्याने गुरुवारी (ता. ३) लासलगाव बाजार समितीत केवळ दोन वाहनांतून कांदा खरेदी करून जास्तीत जास्त दोन हजार ५८ व कमीत कमी एक हजार ८०० रुपये दराने कांदा खरेदी केला गेला. दरम्यान, बाजार समिती आवारात एक हजार ४०० वाहनांतून सकाळी अकरापर्यंत एक हजार ५७ वाहनांचे लिलाव झाले. कमीत कमी ७०० रुपये, जास्तीत जास्त दोन हजार १३१, तर सरासरी एक हजार ८०० रुपये दर मिळाला होता.

lasalgaon onion auction
नाशिकमध्ये निर्बंध उठल्याच्या चर्चेमुळे संभ्रम!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.