सोन्याचा कांदा! शेतकऱ्याची भरभराट अन् टुमदार बंगल्यांचं काय गुपित?

yeola nashik
yeola nashikesakal
Updated on

येवला (जि.नाशिक) : या नभाने या भुईला दान द्यावेआणि माझ्या पापणीला पूर यावे..! गुंतलेले प्राण या रानात माझे फाटकी ही झोपडी काळीज माझे..! कवी ना. धो. महानोरांनी अतिशय समर्पक शब्दात शेतकऱ्याचं शेती-मातीच्या आणि झोपडीच्या नात्याचं वर्णन केलं आहे. शेतकऱ्याच्या मनात वाटणाऱ्या याच काव्यपंक्तीची प्रचिती येते येवल्यातील धनकवाडी या गावात...! सोन्याचा कांदा शेतकऱ्याचा पदरी पडला आणि त्या सोन्यातून टुमदार बंगला उभा राहिला. नेमकं काय गुपित आहे?

सोन्याचा कांदा पदरी पडला आणि त्या सोन्यातून टुमदार बंगला उभा राहिला

साईनाथ व अनिल जाधव या युवा शेतकऱ्यांना या कांद्याने भरभरून दान दिले अन यातूनच टूमदार बंगला साकारल्याने कांदा पिकाविषयी ही अनोखी उतराई केली आहे. बळीराजाशी निसर्गाने कितीही दगाफटका केला तरी काळ्या मातीवर तो निस्सीम प्रेम करतो. तिच्यावर जिवापाड विश्वास ठेवतो आणि एक ना एक दिवस त्याला याचे फळ मिळतेच. येवल्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांनी अगदी ५० रुपये क्विंटल रुपये दरानेही कांदा विक्री केला, पण गेल्या वीस-पंचवीस वर्षात कांद्यावरची भक्ती मात्र कधीही ढळू दिली नाही. म्हणूनच गेल्या तीन-चार वर्षात याच कांद्याने शेतकऱ्यांची झोपडी मोडीत काढून बांधावर टुमदार बंगले उभे करण्याचा योग जुळवून आणला आहे.

कांद्याचा स्टॅच्च्यू उभारून आगळी कृतज्ञता

काळ्या मातीत पिकवलेल्या कांद्याच्या पिकाचं सोनं झालं आणि त्या सोन्यातून टुमदार बंगला उभा राहिला म्हणून या बंगल्याविषयी कृतज्ञता व्यक्त करत धनकवाडी येथील प्रगतिशील शेतकरी साईनाथ जाधव व अनिल जाधव या दोन शेतकरी भावंडांनी बंगल्यावरच दीडशे किलोचा कांद्याचा स्टॅच्च्यू उभारून आगळी कृतज्ञता व्यक्त केली.

कांद्याने दिली मोठी साथ

तालुक्यातील शेतकरी गेल्या ४०-५० वर्षापासून कांद्याचे पीक घेतात. कधी तो नफ्यात तर कधी तोट्यातही परंतु हाच कांदा आपल्या श्रमाचे मोल जाणवेल असा विश्वास ठेवत त्यांनी उत्पादन वाढीच्या अनुषंगाने दरवर्षीच कांद्याला प्राधान्य दिले. मागील वर्षी त्यांना नशिबाची साथ मिळाली आणि सुमारे दहा एकरात पिकवलेल्या कांद्याला भावही चांगला मिळाला. परिणामी खर्च वजा जाता त्यांच्या हातात बारा ते पंधरा लाख रुपये शिल्लक राहिल्याने त्यातून शेतात टुमदार बंगला बांधला. ज्या कांद्याने आपल्यावर ही माया केली, त्याप्रति कृतज्ञता म्हणून त्यांनी घरावर कांद्याची प्रतिकृती उभारण्याचा निर्णय घेतला.

yeola nashik
नाशिक : वैद्यकीय भरतीला हिरवा कंदील

अठरा हजार आला खर्च

सुरुवातीला असा कांदा कसा तयार करावा हा प्रश्न निर्माण झाला होता. त्यातच लासलगाव बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर कांद्याची प्रतिकृती पाहण्यात आली आणि त्यांच्या निश्चयाला बळ मिळाले.या पद्धतीनेच त्यांनी घरावर सर्वांना दुरून दिसेल अशी भव्य प्रतिकृती उभी केली आहे. यासाठी त्यांना सुमारे १८ हजार पर्यंत खर्चही आला आहे. मात्र अठरा हजारापेक्षा ज्या पिकाने आपल्याला तारले,त्याची आपण उतराई करू शकलो याचा मोठा आनंद असल्याचे जाधव बंधू बोलून दाखवतात.विशेष म्हणजे त्यांच्या या प्रयोगाचे सर्वत्र कौतुक होत असून अनेक जण फक्त बंगल्यावरील हा कांदा पाहण्यासाठी येथे येत असून त्यांच्या या निर्णयाचे कौतुक देखील होत आहे.किंबहुना तालुकाभर त्यांचा कांदा चर्चेचा विषय ठरला आहे.

yeola nashik
नाशिक : बाजारपेठेतील गर्दीने चिंतेत भर!

या भागात पाण्याची सोय नसल्यामुळे कोरडवाहू शेती असून हंगामात कांद्याचे पीक निघते. मागील वर्षी कांद्याने कधी नव्हे अशी साथ दिल्याने बंगल्याचे स्वप्न पूर्ण करू झाले. त्यामुळे या कांद्याविषयी कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यासाठी ही प्रतिकृती लावली आहे. कांदे तीनशे रुपये विकले अन तीन हजार रुपये विकले तरी हेच पीक आम्ही कायम करत राहणार.

- साईनाथ जाधव, शेतकरी, धनकवाडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.