Nashik Onion Crop News: नामपूरला कांद्याची उसळी! विक्रमी 25 हजार क्विंटल आवक

Record arrival of onions in market committee in Nampur on Tuesday
Record arrival of onions in market committee in Nampur on Tuesdayesakal
Updated on

Nashik Onion Crop News : येथील बाजार समिती तसेच करंजाड उपबाजार आवारात मंगळवारी (ता. १७) सुमारे २५ हजार क्विंटल उन्हाळ कांद्याची विक्रमी आवक झाली.

कांद्याने पहिल्यांदा तीन हजारांचा टप्पा पार केला असून सोमवारच्या (ता. १६) तुलनेत कांद्याच्या भावात सरासरी ४०० ते ४५० रुपयांची वाढ झाली.

उन्हाळ कांद्याला ३ हजार ३०० ते ३ हजार ६७५ रुपये प्रती क्विंटल असा सर्वोच्च तर ३ हजार ते ३ हजार २०० रुपये प्रतिक्विंटल असा सरासरी भाव मिळाल्याची माहिती बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब अहिरे, उपसभापती भाऊसाहेब कांदळकर यांनी दिली. (Onion boom in Nampur Record 25 thousand quintal income Nashik News)

सध्याच्या भाववाढीचा ठराविक शेतकऱ्यांनाच फायदा मिळणार आहे. सप्टेंबर महिन्यात कांदा व्यापाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांमुळे अनेक दिवस जिल्ह्यातील बाजार समित्या बंद होत्या.

त्यामुळे सप्टेंबरमध्ये बाजार समित्यांमध्ये कोट्यवधी रुपयांचे आर्थिक व्यवहार ठप्पच होते. गेल्या आठवड्यापासून येथील बाजार समिती, करंजाड उपबाजार आवारात उन्हाळ कांद्याची विक्रमी आवक होत आहे.

मार्च महिन्यापासून कांद्याच्या दरात घसरण झाल्याने शेतकऱ्यांचा उत्पादनखर्च देखील भरून निघत नव्हता. कांद्याच्या दरात सातत्याने चढउतार होत असल्याने शेतकरी दैनंदिन कांदा विक्रीचे नियोजन करत आहे.

कांद्याचे दर काही प्रमाणात टिकून असल्याने उन्हाळ कांद्याची बाजारात विक्रमी आवक होत आहे. कांद्याने भरलेल्या वाहनांच्या गर्दीमुळे नळकस रस्त्यालगत वाहतूक विस्कळीत झाली होती.

परिसरातून येथील बाजार समितीत, करंजाड उपबाजार आवारात मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत आहे. सकाळी दहाला लिलावाला सुरुवात झाली. नामपूरला ७४७ वाहने तर करंजाडला ५४० वाहनांचे लिलाव करण्यात आले.

Record arrival of onions in market committee in Nampur on Tuesday
Nashik Onion News: लासलगावला कांदा @3555 रुपये! सरासरी 3250 रुपये प्रतिक्विंटल भाव

शेतकऱ्यांनी मालाची प्रतवारी करून माल विक्रीस आणावा, लिलाव झाल्यानंतर संबंधित व्यापाऱ्यांकडून रोख पेमेंट घ्यावे, शेतकऱ्यांनी वाहन पार्किंग करताना बाजार समिती प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन सचिव संतोष गायकवाड, अरुण अहिरे यांनी केले आहे.

नामपूरचे बाजारभाव व वाहने

१) ३३००/३६७५ : १९६

२) ३०००/३२०० : २२६

३) २५००/३००० : ८०

४) २०००/२५०० : ६५

५) १५००/२००० : ७१

६)१०००/१५०० : २१

७) ०२८५/१०००: ८

Record arrival of onions in market committee in Nampur on Tuesday
Nashik Rain Crisis: दुष्काळाची सर्वाधिक दाहकता, तरीही शासनाचे दुर्लक्ष! नांदगाव तालुक्यातील चित्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.