Nashik News: कांदा दराच्या स्थिरीकरणासाठी व कांदा संरक्षणासाठी ‘कृषक’चे नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान हे कांदा उत्पादकासाठी क्रांतिकारक पाऊल आहे असे प्रतिपादन अणुऊर्जा विभागाचे सचिव आणि अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ. अजित कुमार मोहंती यांनी लासलगाव येथे शुक्रवारी झालेल्या किसान मेळाव्यात केले. 'कृषक’ आवारात झालेल्या या मेळाव्यास भाभा अणुसंशोधन केंद्राचे संचालक विवेक भसीन उपस्थित होते. (onion conservation trial successful at Lasalgaon nashik news)
श्री. मोहंती म्हणाले,‘ किसान मेळावा हा कांदा उत्पादकांसाठी दिशादर्शक असून परिसरातील शेतकऱ्यांनी या माध्यमातून ‘कृषक’मधील संवर्धन चाचण्या यशस्वी केल्याबद्दल समाधान व्यक्त करत भारतातील अन्न संरक्षण वाढवण्याच्या दिशेने ते महत्त्वाचे पाऊल असल्याचे सांगितले. अणुऊर्जा केंद्राच्या जॉइंट सेक्रेटरी श्रीमती सुषमा शेटे म्हणाल्या,‘ रेडिएशनमुळे कांद्याचे आयुष्य वाढते, यासाठी कांदा काढणीनंतर एक महिन्याच्या आत प्रक्रिया करावी लागते, यासाठी सहा ते सात महिने ठेवावे लागतात.
ही प्रक्रिया प्रामुख्याने खाद्यपदार्थसाठी उपयोगी आहे. आंब्यावर रेडिएशन केल्यानंतर अमेरिका व ऑस्ट्रेलिया या ठिकाणी पाठविला जातो. या रेडिएशनमुळे शरीरावर कोणताही परिणाम होत नाही, कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी पायलट प्रोजेक्ट ‘कृषक’मध्ये सुरू करण्यात आला असून त्यात प्रायोगिक तत्त्वावर २५० टन कांदा मोफत प्रक्रिया करून मिळणार आहे. यासाठी स्टोरेज खर्च प्रती एक महिना एक किलो साठी एक रुपया व रेडिएशन खर्च एक रुपये व इतर खर्च असे साडेसहा रुपये शेतकऱ्यांना खर्च येतो, पण शेतकऱ्यांनी साठवणूक केलेल्या कांदा चाळीस टक्के खराब होतो, तसा या प्रक्रियेतून गेलेला कांदा शेतकऱ्यांचा हातात ९७ टक्के मिळतो.
कांदा संरक्षण हाच हेतू
कांदा संरक्षणासाठी बीएआरसीच्या नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचे कांदा बाजार भावाच्या स्थिरतेसाठी महत्त्वपूर्ण योगदान असून लासलगाव येथे कृषी युनिटमध्ये ही चाचणी यशस्वी झाली आहे. सर्व संवर्धन चाचण्या यशस्वी झाल्यानंतर शेतकरी आणि शेतकरी उत्पादक संस्था यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी पायलट प्रोजेक्ट म्हणून किसान मेळावा घेण्यात आला.
मंदीच्या काळात कांद्याची कमतरता, कांद्याचे वजन कमी होणे, कुजणे, मोड येणे व इतर समस्या बाजारभावातील चढ-उतार आणि कांदा काढणीनंतर साठवणुकीतील होणारे मोठे नुकसान टाळण्यासाठी विकिरण केलेले कांदे साडे सात महिने चांगल्या स्थितीत साठवू शकतो.
माजी संचालक डॉ. तदनुसार घंटी, बीएआरसीचे फूड टेक्नॉलॉजीचे मुख्य डॉ. सत्येंद्र गौतम, अनुजा केंद्राचे जॉईन सेक्रेटरी श्रीमती सुषमा शेटे, महाराष्ट्र राज्य कृषी अधिकारी बालकृष्ण सूर्यवंशी, डायरेक्टर ऑफ इन्फ्रा कुलचे संजय गुप्ता, निफाडच्या प्रांताधिकारी हेमांगी पाटील यांच्यासह जिल्हा कृषी अधिकारी सोनवणे, तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार उपस्थित होते. डॉ. मोहंती यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला व विविध प्रश्नांची उत्तरे शेतकऱ्यांना दिली. प्रत्येक उपस्थित बांधवाला रेडिएशन केलेल्या कांद्याची पाच किलोची गोणी सप्रेम भेट देण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.