Onion Crisis : येथील बाजार समितीच्या आवारात कांद्याला बाराशे रुपये एवढा भाव पुकारण्यात आल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्याने लिलावाच्या वेळी गळफास घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने मोठी खळबळ उडाली.
यावेळी अन्य शेतकऱ्यांनी रोखल्याने अनुचित घटना घडली नाही. या प्रकारानंतर पुन्हा फेर लिलाव पुकारण्यात आल्याने मिळालेल्या सुधारित भावात या शेतकऱ्याचा कांदा खरेदी करण्यात आला. (Onion Crisis Farmers suicide attempt due to non payment of onion nashik)
चितारखेडा (ता. वैजापूर) येथील शेतकरी चंद्रशेखर साळुंके यांनी आपला कांदा विक्रीसाठी नांदगाव बाजार समितीत आणला होता. तो आणण्यापूर्वी त्यातील काही कांदा पोखरी शिवारातील एका खासगी बाजार समितीत लिलावात ठेवला.
त्यात श्री. साळुंके यांना १ हजार ५०० भाव मिळाला. त्यानंतर उरलेला कांदा नांदगावच्या बाजार समितीत आणला असता लिलावात त्यांना १ हजार २०० रुपये भाव मिळाला.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
त्यामुळे संतप्त झालेल्या साळुंके यांनी जाब विचारत बाजार समितीच्या आडतदार व्यापारी प्रशासन व संचालक मंडळाच्या कार्यपद्धती विरोधात तीव्र भावना व्यक्त करीत आपण गळफास घेऊ असे म्हणत तसे करण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर जितेंद्र गरुड यांनी साळुंके यांची समजूत काढीत फेरलिलाव पुकारण्याची विनंती आडतदारांनी केली. त्यात श्री. साळुंके यांच्या कांद्याला चौदाशे रूपये भाव दिला. मात्र या संपूर्ण प्रकरणाची शहरात चांगलीच चर्चा झाली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.