Farmer Agitation : शेतकरी संघटनेचे महामार्गावर रास्तारोको आंदोलन

Agitation by Farmers
Agitation by Farmersesakal
Updated on

मालेगाव (जि. नाशिक) : मुंबई-आग्रा महामार्गावरील टेहरे हुतात्मा चौकात शेतकरी संघटनेतर्फे कांदा प्रश्नावर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कांदा बाजार स्वातंञ्य अर्थाग्रह (सत्याग्रह) मोहिमेत रास्तारोको आंदोलन करण्यात आले. रास्तारोकोपुर्वी 'हुतात्मा चौक' येथील स्मारकाला वंदन व शाहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

हुतात्मा चौकापासून महामार्गापर्यंत केंद्रीय वाणिज्य, व्यापार व अन्न नागरी पुरवठामंत्री पियुष गोयल यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. यानंतर रास्ता रोकोला सुरुवात झाली. दोन तासाच्या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत होवून दुतर्फा वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.

शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ललित बहाले-पाटील यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. यावेळी कांदा कायमस्वरुपी आवश्यक वस्तू कायद्याच्या सुचितुन वगळावा, भाव स्थिरीकरण निधी योजना रद्द करावी असे मत बळीराज्य पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडीच्या विभाग प्रमुख सीमा नरोडे यांनी मांडले. श्री. गोयल यांच्याकडे परराष्ट्रात देशातील मालाची निर्यात वाढविण्याची जवाबदारी असतांना त्यांनी त्याउलट निर्णय घेऊन निर्यात रद्द करुन अनेक देशांशी झालेले वाणिज्य करार मोडले. (Onion Crisis Rastaroko agitation by farmers organizations on highway Nashik Latest Marathi News)

Agitation by Farmers
Kirankumar Bakale Controversial Case : अधिकाऱ्यांनो, आतातरी ‘तोंड’ सांभाळा!

त्यामुळे भारत सरकारच्या निर्यात धोरणाची विश्वासार्हता संपुष्टात आणली. देशातील कांदा बांगलादेश, यमन व अरब देश आयात करायला तयार नसल्याने कांदा संकट निर्माण झाले. कांदा आयात करणारे देश आता कांदा उत्पादन घेण्याच्या प्रयत्नात आहेत. यातून भविष्यात कांद्याचे संकट बिकट होईल. ४० टक्के कांदा निर्यात करणारा देश साडेसात टक्के निर्यातीवर आला. त्यामुळे श्री. गोयल यांना गावबंदी करण्याचे आवाहन श्री. पाटील-बहाळे यांनी केले. कांद्याच्या किंमती कमी झल्याने उत्पादन खर्च देखील निघत नसल्याचे सांगताना प्रभाकर शेवाळे यांचा कंठ गाठून आला. टेहरे ग्रामस्थांनी आंदोलनात विशेष सहभाग घेत सहकार्य केले.

रास्तारोको आंदोलनात शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अर्जुन बोराडे, शशिकांत भदाणे, देवीदास पवार, डॉ. तुषार शेवाळे, राजेंद्र भोसले, बाळासाहेब हिंगे, शेखर पवार, निखिल पवार, प्रा. के. एन.अहिरे, प्रा. अनिल निकम, शेखर पगार, प्रभाकर शेवाळे, चंद्रकांत शेवाळे, अरुण पाटील, संदीप पाटील, आर डी निकम, संतु जामरे, गुलाब सिंघ, आत्माराम पाटील, रामनाथ ढिकले, भानुदास ढिकले, शैलेंद्र कापडणीस, बाळासाहेब चौधरी, संतु बोराडे, सुरेश जाधव, किरण गवारे, बाबासाहेब गुजर, यशवंत आथरे, अशोक भंडारे, तानाजी बोराडे आदींसह विविध भागातील कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Agitation by Farmers
थकीत गाळेधारकांनी २५ टक्के रक्कम भरावी महापालिकेचे आदेश; अन्यथा जप्तीची कारवाई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.