Onion Crisis : अवकाळीत जगवलं अन् भाव नसल्याने कांद्याने रडवलं! शेतकऱ्यांना प्रतीक्षा भाववाढीची

Onion Price
Onion Priceesakal
Updated on

अभोणा (जि. नाशिक) : कसमादे परिसरात चालू हंगामात आर्थिक व नैसर्गिक संकटांचा सामना करून कसेबसे कांद्याचे पीक हातात आले.

यात अवकाळी पावसात सुरवातीलाच कांद्याचे रोप खराब झाल्याने दुबार बियाणाचा फटका, मजुरांच्या टंचाईमुळे अतिरिक्त मजुरीचा भार, भारनियमन व रोहित्र दुरुस्तीचा अचानक वाढलेला बोजा, तर खत आणि रासायनिक औषधांच्या गगनाला भिडलेल्या किमती, अवकाळी, गारपीटचा फटका सोसल्यानंतर पडलेले भाव यानंतर आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना भाववाढीची प्रतिक्षा लागून राहिली आहे. (Onion Crisis Untimely life and lack of value onion cried Farmers wait for price hike nashik news)

यंदा कसमादेत विक्रमी कांद्याचे उत्पादन घेण्यात आले. मात्र ऐन मोसमातच कांद्याचे दर कोसळले. यातच अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे कांदा उत्पादन खर्चात ३० ते ३५ टक्के वाढीची झळ सोसून, हाती आलेला कांदा मात्र मातीमोल भावाने विकण्याची वेळ आल्याने, कांद्याने उत्पादकांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. ढगाळ आणि बदलत्या वातावरणात कांदा काढणीसाठी मजुरांना जास्तीच्या दराने मजुरी द्यावी लागली.

पुढील हंगामासाठी बियाणे, औषधे विक्रेते यांची तातडीची देणी, तर लग्नसराईमुळे काही शेतकरी कुटुंबात लग्नसमारंभ, हा सर्व खर्च भागविण्यासाठी कांदा विक्रीशिवाय पर्याय नाही. मात्र भावात प्रचंड घसरण झाल्याने नाइलाजास्तव तातडीच्या खर्चासाठी विक्री करावी लागत आहे.

तर काही ठिकाणी शेतातच कांदा सोडून देण्याची नामुष्की ओढवली आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना शासनाकडून अनुदानही जाहीर झाले. मात्र जाचक अटींमुळे बहुतांश शेतकरी या लाभापासून वंचित राहण्याचे चित्र दिसत आहे.

किमान पंधराशे ते दोन हजार रुपये भाव राहिला, तरच शेतकऱ्यांना आधार मिळू शकतो. मात्र कांद्याच्या दरात सर्वत्र मोठी घसरण झाली आहे.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

Onion Price
Amruta Pawar : पक्षाने आदेश दिल्यास जिल्ह्यात कुठेही लढणार! : अमृता पवार

मागील दोन वर्षांत कांदा उत्पादनाचा खर्च दुपटीने वाढला आहे. शेतकऱ्यांवर इतकी बिकट परिस्थिती आली आहे की, 'आमदनी अठ्ठनी, खर्चा रुपय्या'. कांदा बाजारात नेण्याचा खर्चही शेतकऱ्यांना आता परवडत नाही.

अवकाळी पावसाच्या फटक्याने, उत्पादन तर घटलेच. त्यात बाजारभावात घसरण झाल्याने,शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. अशा हवालदिल स्थितीत तातडीची देणी आवश्यक असल्याने कांदा उत्पादकांसमोर सध्या तरी काही पर्याय दिसत नाही. किमान उत्पादन खर्च निघेल एवढा तरी भाव मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

"अवकाळी पावसाच्या फटाक्याने, कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अतिरिक्त खर्चात वाढ होऊन, एकूण उत्पादन खर्चात प्रचंड वाढ झाली आहे. तुलनेने कांद्याला मिळणारा भाव मात्र अत्यंत कमी असल्याने, शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. योग्य भाव न मिळाल्यास, कांदा सोडून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे."-भगवान पाटील, कांदा उत्पादक, दह्याणे (पाळे)

Onion Price
Nashik News : कामयानीसह जनता व कुशीनगर एक्सप्रेसचे नांदगावचे थांबे पूर्ववत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.