Nashik Unseasonal Rain : आभाळ फाटलं, काळीज तुटलं; हाताच्या फोडासारखं पिकांना जपलं अन..

Onion crop harvested in untimely season damaged nashik news
Onion crop harvested in untimely season damaged nashik newsesakal
Updated on

भाऊसाहेब गोसावी - सकाळ वृत्तसेवा

चांदवड - आभाळ फाटलं, काळीज तुटलं; हाताच्या फोडासारखं पिकांना जपलं, आज अवकाळी पावसाने सारं हिरावलं. आज आलेल्या अवकाळीने काढणीला आलेल्या कांद्याचे पीक पुर्णतः नष्ट झाले आहे. तर द्राक्ष बागांचेही प्रचंड नुकसान झाले आहे.

चांदवड तालुक्यातील शेती मातीला आज अवकाळी पावसासह गारपिटीने चांगलेच झोडपले आहे. यामुळे फळबागा आणि शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अगोदरच पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झालेला त्यामुळे थोड्या पाण्यावर काही प्रमाणात कांदा द्राक्षासारखी पिकं उभी केली होती.(Onion crop harvested in untimely season damaged nashik news)

दुष्काळाने हैराण झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची पुन्हा उभारी घेण्याची उमेदच मोडून पडली आहे. आज झालेल्या पावसाने उरलीसुरली शेतीही उद्ध्वस्त झाली आहे. शासनाकडून अपेक्षित प्रतिसाद आणि मदत अद्यापही मिळाली नसल्यामुळे अनेक शेतकरी हवालदिल झाले आहेत. आता पंचनामे करण्यासाठी नको तर मौतीसाठीच या, अशी उद्विग्न प्रतिक्रिया एका शेतकऱ्याने व्यक्त केली आहे.

या पावसात तालुक्यातील वडगाव पंगू, रापली, वागदर्डी, भडाणे, तळेगाव रोही, वाकी खुर्द, निमोण, डोणगाव या गावांसह तालुक्यातील अनेक गावांत गारपीट अन् अवकाळीने हाहाकार माजला.

काही तासांसाठी वडगाव पंगू, वाकी खुर्द परीसरात शेतशिवार गारांनी पुर्ण व्यापून गेले होते आपण हिमालयात आलोत की काय असा देखील प्रकार या अतिवृष्टीने पाहायला मिळाला. काढणीला आलेलं कांद्याचे पीक पुर्णतः नष्ट झाले तर द्राक्ष बागांचेही प्रचंड नुकसान झाले आहे

Onion crop harvested in untimely season damaged nashik news
Nashik Unseasonal Rain: नांदूर शिंगोटे येथे 45 मिनिटे पावसाची जोरदार हजेरी

''आता या शेतकऱ्यांना पंचनामे लवकरात लवकर करणे देखील गरजेचे आहे. रात्रीचा प्रसंग सांगताना शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येत होतं. हे नुकसान कसं भरून निघणार या शेतकऱ्यांना सरकार कसा न्याय देणार, हे देखील आज पाहणे गरजेचे आहे.

अवकाळीने झालेल्या नुकसानीची पाहणी करून तालुक्यातील तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक यांना पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.''-मंदार कुलकर्णी, तहसीलदार चांदवड

Onion crop harvested in untimely season damaged nashik news
Nashik Unseasonal Rain : उघड दार देवा आता...! डोळ्यादेखत सोन्यासारखी पिकं गेली मातीत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()