Nashik Rain Crisis : खरीप कांद्याचा पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चित्रदुर्ग-विजापूर-बागलकोट (कर्नाटक), अलवर (राजस्थान), खंडवा (मध्य प्रदेश), कर्नुल (आंध्र प्रदेश), अनंतपूर (तेलंगणा) या भागाबरोबर चांदवड पट्टा जोडला गेला होता.
पण, यंदा वरुणराजाची मेहरबानी झाली नसल्याने चांदवड पट्टा म्हणून परिचित झालेल्या चांदवडसह येवला, नांदगाव, मालेगाव, देवळा तालुक्यांत कांद्याची रोपे तयार होऊनही लागवड झालेली नाही. (Onion cultivation in crisis due to no rain Chandwad yeola Nandgaon Malegaon Deola belt in trouble nashik)
गेल्या वर्षीच्या खरिपात चांदवड पट्ट्यातील २१ हजारांहून अधिक हेक्टरमधून तीन लाख १९ हजार टन कांद्याचे उत्पादन मिळाले होते. त्या वेळी चांदवड तालुक्यात ११ हजार हेक्टरवर शेतकऱ्यांनी उन्हाळ कांद्याची लागवड केलेली होती.
शिवाय, गेल्या वर्षी जिल्ह्यात २७ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावर खरीप कांद्याची लागवड झाली होती. चांदवड पट्ट्यात खरीप कांदा लागवडीला वेग आलेला नसल्याने केवळ खरिपाचा कांदा बाजारात येण्यासाठी महिनाभराचा उशीर होणार नसून, ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांत होणाऱ्या कांद्याच्या टंचाईसाठी हा संकेत मानायचा काय? असा गंभीर प्रश्न तयार झाला आहे.
दरम्यान, गेल्या वर्षी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सिन्नर तालुक्यात २९, येवल्यात २३०, चांदवडमध्ये ८६३, मालेगावमध्ये ५, बागलाणमध्ये ३०, दिंडोरीत ८५, देवळ्यात १४९ हेक्टरवर कांद्याच्या रोपांची रोपवाटिका शेतकऱ्यांनी तयार केली होती.
त्या तुलनेत यंदा आतापर्यंत कांद्याची रोपवाटिका मोठ्या प्रमाणात तयार झाली असून, निफाड, नांदगाव, कळवण तालुक्यांत रोपवाटिका तयार झाल्या आहेत.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
खरीप कांदा लागवडीची जिल्ह्यातील सद्यस्थिती (आकडे हेक्टरमध्ये दर्शवितात)
तालुक्याचे नाव रोपवाटिका प्रत्यक्ष लागवड
निफाड ३० ०
सिन्नर ४२.५ २८९
येवला १ हजार ३०० ५१
चांदवड १ हजार २८७ २५०
मालेगाव ७० २५.५
बागलाण १८२ ६५
नांदगाव १७९ ०
कळवण ६८ २०
दिंडोरी २० ०
देवळा २३८.८० १०
एकूण ३ हजार ४१७.६० ७१०.५०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.