नरकोळ (जि. नाशिक) : बागलाण तालुक्यातील बहुसंख्य गावात यंदा प्रथमच उन्हाळी हंगामातील कांदा लागवड विक्रमी झाली आहे. निसर्गाने साथ दिल्यास कांदा उत्पादनात दुप्पटीने वाढ होईल.
गेल्या वर्षी दमदार पाऊस झाल्याने विहिरीच्या पाण्याची पातळी टिकून राहिली. उन्हाळी हंगामातील कांदा निश्चितपणे निघेल या शाश्र्वतीने गेलेल्या नोव्हेंबर महिन्यापासून ही कांदा लागवड जोमाने सुरू असून जानेवारी अखेरपर्यंत ही लागवड ५० हजार हेक्टरवर जाण्याची शक्यता आहे.
कांद्याला समाधानकारक भाव मिळाल्यास उन्हाळ कांदा शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवेल. (Onion Cultivation Record Break in Baglan Taluka Nashik News)
तालुक्यातील छोट्या मोठ्या गावातील कानाकोपऱ्यात कांदा लागवड झाली आहे. यामुळे मजुरांनाही रोजगार उपलब्ध झाला. कांदा लागवड होत असताना मध्यंतरी ढगाळ वातावरणामुळे उत्पादकाची धडकी सुरू झाली होती.
हे वातावरण या पिकासाठी घातक असते. लागवड झालेल्या कांद्याला फवारणी शिवाय पर्याय नसतो. गेल्या तीन-चार दिवसांपासून थंडीचा जोर वाढत असल्याने ही थंडी पिकांना पोषक ठरत आहे. दिवाळी हंगामात परतीच्या पावसाने मुक्काम वाढविल्यामुळे कांदा रोपांची कोणालाच शाश्र्वती नसल्याने बाजारातील महागडे बियाणे विकत घेऊन टाकले त्यातूनच लागवड पूर्ण झाली.
आता काळजीने या पिकासाठी तणनाशक रासायनिक खते व रात्रीचा दिवस करून पाणी देण्यासाठी परीश्रम घेत असून कांद्याला काय भाव राहील यावरच उत्पादकांचे आर्थिक ताळमेळ अवलंबून आहे. बागलाण तालुक्यात गेल्या वर्षापेक्षा तीन ते चार हजार हेक्टर क्षेत्र लागवड जास्त आहे. कांदा लागवडीमुळे मजुरांनाही सुगीचे दिवस आले आहेत.
हेही वाचा : सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'
एक एकर साठी येणारा खर्च
शेत तयार करणे- ६ ते ७ हजार रुपये
कांदा रोप- ५ ते ६ हजार रुपये
कांदा लागवड- ८ ते १० हजार रुपये
तणनाशक फवारणी- तीन हजार रुपये
रासायनिक खते - तीन हजार रुपये
निंदणी- दोन हजार रुपये
पाणी भरणे- चार ते पाच हजार रुपये
बागलाण कृषी मंडल विभागातील लागवड क्षेत्र हेक्टरमध्ये (२ जानेवारी २०२३ ची आकडेवारी)
लखमापूर- १३२७१
नामपूर- १६०५०
सटाणा -१२३२०
ताहाराबाद -३२४५
एकूण- ४४८८६
कांदा लागवड वाढीचे कारणे :
यांत्रिकीकरणामुळे शेत एका दिवसात तयार
तणनाशक फवारणीमुळे मजूर संख्या कमी
लागवड व काढणीसाठी आता टेंडर पद्धत
सालदार पद्धत नामशेष, क्षेत्रावर हिशोबानुसार रोख रक्कम
नवनवीन रासायनिक खताचा वापरामुळे वाढते उत्पन्न
"गतवर्षी पेक्षा यंदा कांदा लागवडीचे उच्चांक गाठला आहे. पाऊसमान चांगला असल्याने क्षेत्र वाढले. कांदा व्यतिरिक्त दुसऱ्या पिकाकडे शेतकरी जात नाही."
- सुधाकर पवार, कृषी अधिकारी बागलाण
"उन्हाळी हंगामातील कांदा पीक हे आता हक्काचे झाले आहे. गेल्या वर्षी भाव कमी मिळाला तरी पुढील अपेक्षेने लागवड केली." - पोपट मोरे, कांदा उत्पादक शेतकरी, केरसाणे
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.