Onion Export Ban: निर्यातबंदीने कांद्याचे दर कमी होणार? ग्राहकांना फायदा नाहीच

Summer onion
Summer onionesakal
Updated on

विकास गामणे ः सकाळ वृत्तसेवा

Onion Export Ban: देशांतर्गत कांद्याचे दर वाढले, की ते नियंत्रणात ठेवण्यासाठी लागलीच निर्यातबंदीचे हत्यार उपसते. काही दिवसांपासून कांद्याचे दरवाढ वाढल्याने लागलीच केंद्राने निर्यातबंदीची असलेली मुदत ३१ मार्च २०२४ पर्यंत वाढविली आहे. मात्र, मुळातच देशभरात कांदा उत्पादन घटलेले आहे.

देशांतर्गत लाल कांद्याची लागवड ही दोन लाख हेक्टरने घटली असतानाही उन्हाळ कांद्याची लागवडी दुष्काळ परिस्थितीत मोठ्या प्रमाणात घटेल. साधारणपणे मार्च ते ऑक्टोबर २०२४ पर्यंत केवळ साठवलेल्या उन्हाळ कांद्यावर ग्राहकांची गरज भागविण्यासाठी पुरेसा कांदा उपलब्ध असणार नाही, अशी परिस्थिती आहे. (Onion Export Ban financial loss to farmers nashik news)

या परिस्थितीत कांद्याची उपलब्धता कमी असताना निर्यातबंदीचे हत्यार उपसून केंद्र सरकार केवळ तत्कालीन परिस्थितीत कांदा उत्पादकांचे आर्थिक नुकसान करीत आहे. निर्यातबंदी घातल्याने कांद्याच्या दरवाढीवर कोणताही परिणाम होणार नाही. केवळ त्या काळात बाजारात विक्री करणाऱ्या कांदा उत्पादकांचे आर्थिक नुकसान होईल. मात्र, कांदा व्यापारी मालामाल होणार आहे.

देशात एकूण उत्पन्नाच्या १५ टक्के कांदा उत्पादन नाशिक जिल्ह्यात होते. त्यामुळे कांद्याचे आगर म्हणून नाशिक जिल्ह्याकडे पाहिले जाते. देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याची आवक कमी असल्याने थोडेफार दर कांद्याला मिळत असताना केंद्र सरकारने अधिकाराचा वापर करीत निर्यातबंदी केली. तीन महिन्यांपूर्वीच केंद्र सरकारने ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत निर्यातबंदी केली होती.

त्यावर कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरला होता. मात्र, निर्यातबंदी ‘जैसे थे’ राहिली. सद्यस्थितीत गेल्या वर्षीचा उन्हाळ कांद्याची आवक संपलेली आहे. आता केवळ सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये लागवड झालेला लाल कांदा बाजारात विक्रीसाठी आहे. नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका या कांद्याला बसलेला असल्याने त्याचे उत्पन्न कमी आहे.

Summer onion
Onion Export Ban: पिंपळगावला लिलाव पूर्ववत, मात्र दर दीड हजाराने घसरले

त्यामुळे बाजारात कांद्याची आवक कमी असल्याने कांद्याचे दर वाढले. कांद्याचे दर वाढले की ग्राहकांना कांदा महागात पडेल, या राजकीय भीतीने केंद्र सरकारने लागलीच हस्तक्षेप करीत निर्यातबंदीचे हत्यार उपसले. परंतु, सद्यस्थितीत कांद्याचे देशांतर्गत उत्पादन कमी आहे. यंदा लाल कांद्याची लागवड अपेक्षेप्रमाणे कमी झाली असून, दोन लाख हेक्टरने क्षेत्र घटलेले आहे. या कांद्याला बदलत्या हवामानाचा तसेच गारपिटीचा मोठा फटका बसला.

यातच, उन्हाळ कांद्याची यंदाची लागवडही कमी होईल. दुष्काळी परिस्थितीत असल्याने कांदा क्षेत्र असलेल्या नाशिक जिल्ह्यात पाण्याची उपलब्धता कमी आहे. त्यामुळे या कांद्याची लागवड कमी होण्याचा अंदाज आहे. लाल कांद्याचे कमी झालेले उत्पादन तसेच उन्हाळ कांद्याची लागवड कमी झाली. आगामी वर्षात केंद्राला लोकसभा निवडणुकीला सामोरे जायचे आहे.

यात कांदा दरवाढीचा मुद्दा येण्याची शक्यता लक्षात घेऊन निर्यातबंदीची मुदत वाढविली खरी. मात्र, निर्यातबंदीतून केंद्र सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान करीत आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांचा सरकारवर रोष आहे.

Summer onion
Onion Export Ban: वर्षातून दोनदा कांदा निर्यातीवर निर्बंध; 10 वर्षांत केंद्राचा तब्बल 21 वेळा हस्तक्षेप

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.