Nashik Onion News : कांदा भावात सर्वदूर घसरण न झाल्याने निर्यातबंदीची पिकवलेली अफवा ‘फेल’

Onion
Onion esakal
Updated on

Nashik Onion News : नाशिकचा कांद्याशिवाय आखाती राष्ट्रांसह देशातील ग्राहकांना पर्याय उरला नसल्याने केंद्रातर्फे वापरण्यात आलेले ४० टक्के निर्यातमूल्याचे अस्त्र अगोदर निष्प्रभ ठरले. त्यानंतर कांदा निर्यातबंदीची अफवा खरेदीदारांकडून वेगाने पसरविण्यात आली.

मात्र सर्वदूर अपेक्षित भावात मोठी घसरण न झाल्याने ही अफवा ‘फेल’ झाली. लासलगाव, विंचूर, मुंगसेमध्ये क्विंटलला तीन हजार २०० रुपये असा सरासरी भाव बुधवार (ता. १८)प्रमाणे गुरुवारी (ता. १९) कायम राहिला. (Onion export ban rumours failed as there was no big fall in expected price nashik news)

कांद्याच्या निर्यातीचे प्रमाण दहा टक्क्यांपर्यंत असल्याचे निर्यातदारांचे म्हणणे आहे. मात्र देशात घरगुती वापरासाठी नाशिकचा उन्हाळी कांदा पर्याय उरला आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे कांद्याच्या भावाचा दिवसेंदिवस आलेख उंचावत निघाला आहे. पिंपळगाव बसवंतमध्ये बुधवारी (ता. १८) सरासरी तीन हजार ४०० रुपये क्विंटल या भावाने कांद्याची विक्री झाली होती.

गुरुवारी (ता. १९) त्यात क्विंटलला दोनशे रुपयांची घसरण झाली. भावाच्या घसरणीचा ‘ट्रेंड’ का सुररू झाला, याची माहिती घेतल्यावर खरेदीदारांकडून निर्यातबंदीची अफवा पसरवली गेल्याचे कारण ऐकावयास मिळाले.

बुधवारच्या तुलनेत गुरुवारी क्विंटलला सरासरी ५० रुपयांनी घसरण होऊन तीन हजार १००, सिन्नरमध्ये शंभर रुपयांनी घसरण होऊन तीन हजार २००, चांदवडमध्ये १३० रुपयांनी घसरण होऊन तीन हजार ५०, मनमाडमध्ये शंभर रुपयांनी घसरण होऊन तीन हजार १००, देवळ्यात ७५ रुपयांनी घसरण होऊन तीन हजार १२५, उमराणेमध्ये ५० रुपयांनी घसरण होऊन तीन हजार २०० रुपये क्विंटल भावाने कांद्याची विक्री झाली. कळवण आणि नामपूरमध्ये तीन हजार रुपये क्विंटल, असा सरासरी भाव कायम राहिला.

Onion
Nashik Onion News: लासलगावला कांदा @3555 रुपये! सरासरी 3250 रुपये प्रतिक्विंटल भाव

इतर बाजारातील कांद्याचे भाव

(क्विंटलला सरासरी रुपयांमध्ये)

- कोल्हापूर - दोन हजार ५००

- छत्रपती संभाजीनगर - दोन हजार ४५०

- मुंबई - दोन हजार ६००

- मंचर - तीन हजार ४२५

- सातारा - दोन हजार ९००

- संगमनेर - दोन हजार १५५

- कोपरगाव - तीन हजार २००

Onion
Onion News: कांद्याच्या दराची वाटचाल 4 हजारांकडे! पिंपळगावला प्रतिक्विंटल 3 हजार 960 एवढा उंच्चाकी दर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.