Nashik Onion News: कांदा भले रेशनद्वारे वाटा; पण बाजारात नको! कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा इशारा

Onion News
Onion Newsesakal
Updated on

Onion Market News : केंद्र सरकारने या वर्षी ‘नाफेड’ व ‘एनसीसी’च्या माध्यमातून खरेदी केलेला तीन लाख टन कांदा बाजारात आणून कांद्याचे दर कमी करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

सरकारने देशातील ग्राहकांना हा कांदा रेशनिंगद्वारे वाटावा. परंतु हा कांदा बाजारात आणल्यास महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना संपूर्ण राज्यात तीव्र स्वरूपाचे रास्ता रोको आंदोलन करेल, असा इशारा या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिला. (Onion Growers Farmers Association warns of agitation NAFED action Started for selling Nashik News)

अनेक महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या कांद्याची बाजार समितीत मातीमोल विक्री होत आहे. त्या वेळी केंद्र सरकारकडून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कवडीचीही मदत झालेली नाही.

मार्च, एप्रिलमध्ये अवकाळी पाऊस व गारपिटीने अनेक शेतकऱ्यांचा कांदा खराब झाल्यानंतर शिल्लक असलेल्या कांद्याची शेतकऱ्यांनी चाळीमध्ये साठवणूक केली होती. त्यातीलही बराच कांदा सडला.

त्यातून उरलेला चांगला कांदा शेतकरी आता विक्रीसाठी घेऊन येत आहेत. दहा-बारा दिवसांपासून कांद्याच्या दरात किंचित सुधारणा होण्यास सुरवात झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना काही महिन्यांमध्ये झालेले नुकसान भरून निघण्याची आता संधी निर्माण झाली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Onion News
Nashik Kharif Sowing: लाल कांद्याची लागवड रखडली! खरिपाची 20, लेट खरिपाची 35 हजार हेक्टरवर लागवड

केंद्र सरकारने बफर स्टॉकमधील कांदा बाजारात उतरविण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये केंद्र सरकारप्रति प्रचंड संतापाची भावना तयार झाली आहे.

केंद्र सरकारचे धोरण ग्राहक धार्जीने असून, शेतकऱ्यांचा कांदा जेव्हा जेव्हा कवडीमोल विकला जातो, त्या वेळेस सरकारकडून कोणत्याही प्रकारची शेतकऱ्यांना मदत होत नाही.

कांद्याचे दर अगदी थोडे जरी सुधारले, त्या वेळेस मात्र केंद्र सरकारकडून कांद्याचे दर पाडण्यासाठी विविध प्रकारे उपाययोजना केल्या जातात. हे धोरण शेतकरीविरोधी असून, कांदा उत्पादकांना प्रचंड आर्थिक नुकसान करणारे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Onion News
Onion Price : कांदा उत्पादकांना दिलासा! मंचरला कांद्याला प्रति 10 किलोला 325 रुपये बाजार भाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.