Onion News : नाशिकच्या शेतकऱ्यांसाठी कांदाच भरवशाचा! फिलिपाइन्स आयात परवान्याची प्रतीक्षा

Onion
Onion esakal
Updated on

नाशिक : गेल्या तीन वर्षांमध्ये जानेवारी, फेब्रुवारी, मार्चमध्ये रांगड्या (लेट खरीप) कांद्याला चांगला भाव मिळाला खरा; पण यंदा अजूनही किरकोळ व्यापारात गेल्या वर्षीचा उन्हाळ कांदा मोठ्या प्रमाणात विकला जात असल्याने यंदा चौथ्या वर्षी रांगड्याला चांगला भाव मिळणार काय? याबद्दलचे प्रश्‍नचिन्ह आहे.

अशातच, पावसामुळे यंदा रांगडा कांद्याचे क्षेत्र ‘शिफ्ट’ झाल्याने यंदाही गेल्या वर्षी इतके उन्हाळ कांद्याचे उत्पादन कांद्याचा पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातून मिळण्याची शक्यता निर्माण झाली. उन्हाळ कांद्याच्या लागवडीचा वेग पाहता, नाशिकच्या शेतकऱ्यांसाठी कांदाच भरवशाचा वाटतो आहे, हे स्पष्टपणे दिसते.

Onion
Onion : कांदे दीर्घकाळ ताजे ठेवण्यासाठी काय कराल ?

भारतीय निर्यातदारांना फिलिपाइन्स सरकारच्या कांदा आयात परवान्याची प्रतीक्षा आहे. दरम्यान, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेशातील रांगड्या कांद्याचे आव्हान महाराष्ट्रातील रांगड्या कांद्यापुढे असेल. त्याचवेळी ‘अर्ली’ उन्हाळ कांद्याच्या क्षेत्रात ‘शिफ्ट’ झालेल्या नगर जिल्ह्यातील उन्हाळ कांदा मार्चच्या मध्याला बाजारात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना कांद्याला चांगला भाव मिळावा म्हणून निर्यातीला केंद्र व राज्य सरकारने प्रोत्साहन देण्याची आवश्‍यकता निर्माण झाल्याचे बाजारपेठीय अभ्यासकांचे म्हणणे आहे. दरम्यान, नाशिक जिल्ह्यात गेल्या वर्षी २९ हजार ३३८ हेक्टरवर खरीप, ६० हजार ८४३ हेक्टरवर रांगडा, तर दोन लाख १६ हजार ६७४ हेक्टरवर उन्हाळ कांद्याची लागवड झाली होती.

यंदा २७ हजार ६०९ हेक्टरवर खरीप, ५१ हजार ३२१ हेक्टरवर रांगडा कांद्याची लागवड झाली. तसेच उन्हाळ कांद्याच्या लागवडीला वेग आलेला असताना आतापर्यंत पावणेदोन लाख हेक्टरपर्यंत उन्हाळ कांद्याची लागवड पोचली आहे. उर्वरित काळात उन्हाळ कांद्याची लागवड गेल्या वर्षीपर्यंत पोचण्याची शक्यता कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना वाटत आहे.

हेही वाचा: या महामार्गामुळं खरंच येईल 'समृद्धी'?

फिलिपाइन्स अन् पाकिस्तानचे ग्राहक

भारत-पाकिस्तानमध्ये थेट व्यापारी संबंध अस्तित्वात नसले, तरीही पाकिस्तानच्या व्यापाऱ्यांनी दुबईमधून नाशिकचा कांदा आपल्या ग्राहकांसाठी खरेदी करण्यास सुरवात केली आहे. त्याचे थेट पडसाद दुबईमधील निर्यातीवर उमटले आहेत.

गेल्या दहा दिवसांमध्ये ८०० कंटेनर कांदा दुबईसाठी निर्यात झाला आहे. त्यातील तीनशे ते चारशे कंटेनर कांदा दुबईमधील ग्राहकांसाठी असून, उरलेल्या कंटेनरमधील कांदा पाकिस्तानच्या व्यापाऱ्यांना पाठविला जाणार असल्याची माहिती भारतीय निर्यातदारांपर्यंत धडकली आहे.

पाकिस्तानच्या मागणीमुळे कंटेनरभर कांद्याचा भाव ३४० ते ३५० डॉलरपर्यंत पोचला आहे. गेल्या वर्षी याच काळात २९० ते २९५ डॉलर इतका भाव मिळत होता. पाकिस्तानमधील नवीन कांदा बाजारात येण्यासाठी मार्च उजाडणार असल्याने भारतीय कांद्याला पाकिस्तानसाठी मागणी राहणार असल्याचे चित्र दिसते.

Onion
घरी बनवा Onion Gel जे दूर करेल केसांचा पातळपणा

चक्रीवादळ आणि अतिवृष्टीने फिलिपाइन्समधील कांद्याचे नुकसान झाल्याने येत्या काही तासांमध्ये फिलिपाइन्स सरकारकडून कांद्याच्या आयातीचे परवाने मिळण्यास सुरवात होण्याची शक्यता असल्याची माहिती भारतीय निर्यातदारांना मिळाली आहे. फिलिपाइन्समध्ये भारतीय चलनानुसार एक हजार रुपये किलोपर्यंत कांद्याचे भाव पोचले आहेत.

फिलिपाइन्समध्ये सप्टेंबर ते डिसेंबरपर्यंत कांद्याच्या आयातीला परवानगी दिली जाते. मात्र फिलिपाइन्समध्ये चाळीस टक्के अतिरिक्त कांद्याचे उत्पादन मिळण्याच्या शक्यतेमुळे फिलिपाइन्स सरकारने आतापर्यंत कांद्याच्या आयातीचे परवाने दिलेले नव्हते. फिलिपाइन्स आणि पाकिस्तानमधील ग्राहकांचा विचार करता, स्थानिक बाजारपेठेत कांद्याचे भाव स्थिरावण्याची शक्यता कांदा निर्यातदार विकास सिंह यांनी ‘सकाळ'शी बोलताना वर्तवली.

Onion
Onion Crop Crisis : बुरशीमुळे कांदा रोप संकटात; देवळ्यातील शेतकऱ्यांसमोर संकट

उन्हाळ कांद्याचे नाशिकमधील उत्पादन

वर्ष लागवड क्षेत्र हेक्टरमध्ये उत्पादकता टनात एकूण उत्पादन टनामध्ये

२०१८-१९ ८८ हजार ५४५ १७.६५ १५.६२ लाख

२०१९-२० एक लाख ७१ हजार ३१० २२.९३ ३९.२८ लाख

२०२०-२१ एक लाख ६६ हजार ५०३ २०.६४ ३४.३६ लाख

२०२१-२२ दोन लाख १६ हजार ६७४ २६.४८ ५७.३७ लाख

''महाराष्ट्रात रांगडा कांद्याचे क्षेत्र एक ते सव्वालाख हेक्टरपर्यंत असायचे. गेल्या वर्षी दोन लाख ४० हजार हेक्टरवर रांगड्या कांद्याची लागवड झाली होती. यंदा एक लाख ६० हजार हेक्टरच्या आसपास रांगड्या कांद्याची लागवड झाली आहे. मात्र यंदा कांद्याचे पीक चांगले असल्याने उत्पादनात २० ते ३० टक्के वाढ अपेक्षित आहे.

शिवाय रांगड्या कांद्याचे कमी झालेल्या क्षेत्रावर राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये ‘अर्ली’ उन्हाळ कांद्याची लागवड झाली असल्याने गेल्या वर्षी उन्हाळ कांद्याचे उत्पादन यंदाही अपेक्षित असेल.'' - दीपक चव्हाण, शेती अभ्यासक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.