NAFED Onion News : ‘नाफेड’चा कांदा इतर राज्यांत; डॉ. भारती पवार यांचा अधिकाऱ्यांशी संवाद

NAFED Onion News
NAFED Onion Newsesakal
Updated on

NAFED Onion News : कांद्याचे भाव कमी असताना केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना विनंती केल्यावर त्यांनी लाल कांद्याची खरेदी केली.

लाल कांदा खरेदीची व्यवस्था नव्हती, असे सांगून केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी ‘नाफेड’तर्फे खरेदी करण्यात आलेला आणि ‘बफर स्टॉक’ केलेल्या तीन लाख टन कांदा मागणीनुसार घरगुती वापरासाठी इतर राज्यांकरिता दिला जाणार असल्याचे स्पष्ट केले. (Onion of Nafed will be given in other states nashik news)

‘नाफेड’तर्फे राज्यातील कांद्याच्या आगारात कांदा खरेदी केला असला, तरीही इथं कांदा दिला जाणार नाही. त्यासंबंधाने माझे ‘नाफेड’च्या अधिकाऱ्यांशी बोलणं झालं आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची चिंता करण्याचे कारण नाही. इथं खरेदी केलेला कांदा इथं विकून ‘नाफेड’तर्फे कांद्याचे भाव पाडले जाणार नाहीत, असाही निर्वाळा डॉ. पवार यांनी दिला आहे.

कांदा भाव ‘जैसे थे'

शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगले पैसे मिळत असताना ‘नाफेड’तर्फे ‘बफर स्टॉक’मधील कांदा बाजारात आणून भाव पाडण्यात येणार असल्याच्या तक्रारींना तोंड फुटले होते. अशा परिस्थितीत डॉ. पवार यांनी स्पष्टीकरण एकीकडे दिले आहे.

त्याचवेळी दुसरीकडे कांद्याचे भाव ‘जैसे थे' राहिले. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला क्विंटलभर कांद्याला सरासरी भाव पुण्यात एक हजार ७५०, लासलगावमध्ये दोन हजार २८०, पिंपळगाव बसवंतमध्ये दोन हजार ३५० रुपये असा राहिला होता.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

NAFED Onion News
Nashik Onion News: कांदा भले रेशनद्वारे वाटा; पण बाजारात नको! कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा इशारा

आज पुण्यात एक हजार ७५०, लासलगावमध्ये दोन हजार ३०१, पिंपळगाव बसवंतमध्ये दोन हजार ३५० रुपये क्विंटल या सरासरी भावाने कांद्याची विक्री झाली. मनमाडमध्ये क्विंटलभर कांद्याचा आज सरासरी भाव दोन हजार ४०० रुपये असा राहिला.

‘बोलाचा भात अन बोलाची कढी’

पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनी मागील लेट खरीपमधील कांदा हंगामात खरेदी केलेल्या कांद्याला क्विंटलला ३५० रुपयांप्रमाणे २०० क्विंटलपर्यंत मर्यादेतील अनुदान १५ ऑगस्टपूर्वी देण्याची घोषणा विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनावेळी केली होती. मात्र, या घोषणेची अवस्था ‘बोलाचा भात अन बोलाची कढी’ या उक्तीगत राहिल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून उमटली आहे.

महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी मंत्र्यांनी घोषणा करूनही शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा न होणे ही शेतकऱ्यांची फसवणूक असल्याचे म्हटले आहे. शेतकऱ्यांची सरकार थट्टा करीत असून, आगामी निवडणुकीत शेतकरी सत्ताधाऱ्यांना धडा शिकवतील, असा इशारा श्री. दिघोळे यांनी दिला आहे.

सत्ताधाऱ्यांबरोबर असलेल्या माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेतर्फे नाशिकच्या पणन विभाग कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा यापूर्वी देण्यात आला आहे.

NAFED Onion News
Onion Import : नेपाळमधून महाराष्ट्रात कांदा आयात होणार नाही, नाफेडमार्फत विक्रीही नाही- भारती पवार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.