Nashik Onion News: अवकाळीने कांदा लागवड लांबणीवर! शेतात अजूनही ओल, रोपे पिवळी पडली, दुष्टचक्र थांबेना

Onion plants that have turned yellow due to ripening due to rain without hail & Thunderstorms and showers
Onion plants that have turned yellow due to ripening due to rain without hail & Thunderstorms and showersesakal
Updated on

कंधाणे : कसमादे भागात विशेषतः बागलाण व कळवण तालुक्यात उन्हाळी कांदा प्रमुख नगदी पीक असून चालू वर्षी कांदा लागवड सुरू होण्यापूर्वी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने कांदा लागवड खोळंबली आहे.

शेतात अजूनही चिखल असल्यामुळे परिपक्व झालेली रोपे आणि आर्थिक उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत असलेला हंगाम वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे.

बियाणे, दुबार मशागतीच्या भांडवली खर्चात वाढ अशा दुष्टचक्रात सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दुष्काळात तेरावा महिना अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. (Onion planting delayed due to bad weather fields still wet plants turn yellow vicious cycle does not stop Nashik News)

यंदा जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस पडला, अर्थकारणाला चालना देणाऱ्या उन्हाळी कांद्यासाठी दिवाळीपूर्वी रोपे टाकली. महागडी बुरशीनाशक व कीडनाशकांची फवारणी करून ती कशीबशी जगवली.

बाजरी, मक्याच्या सोंगणीनंतर शेणखत टाकून मशागत करून वाफे सरी बांधून कांदा लागवडीसाठी शेतकऱ्यांनी कंबर कसली होती, परंतु अवकाळी पावसामुळे सरी आणि वाफे सपाट झाले आहेत.

अजूनही ढगाळ वातावरण असल्याने व कडक ऊन पडत नसल्याने दुबार मशागतीसाठी वेळ जाणार आहे, त्यामुळे कांदा लागवड लांबणीवर पडली आहे. त्यामुळे पुढचेही सारे नियोजन कोलमडले आहे.

Onion plants that have turned yellow due to ripening due to rain without hail & Thunderstorms and showers
Nashik Water Crisis: उन्हाळ कांद्याचे भवितव्य चणकापूरसह इतर धरणांच्या आवर्तनावर अवलंबून!

सध्याच्या ढगाळ वातावरणात धुके व भरपूर प्रमाणात दवबिंदू पडत असल्याने महागडे बी पेरणी करून परिपक्व झालेली तयार रोपे अग्रभागी पिवळी पडून कुजत आहेत. प्रमुख नगदी कांदा पिकाचा हंगाम वाया जाण्याची धाकधूक वाढली आहे.

त्यातच हवामान विभागाकडून पुढील काही दिवस पुन्हा अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आल्यामुळे आर्थिक कांदा उत्पादक शेतकरी धास्तावला आहे.

"कांदा लागवडीनंतर आणि काढणीवेळी अवकाळी पाऊस, गारपिटीने अस्मानी संकट तसेच शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे कांदा पिकाचा उत्पादन खर्च सुद्धा मिळत नाही. यंदा उन्हाळी कांदा लागवड व उत्पादन कमी असल्याने बाजारभाव तेजीत राहण्याचा अंदाज शेती अभ्यासकांकडून व्यक्त केला जात आहे. परंतु अवकाळी पावसाने सर्व गणित बिघडले."

- गणेश बिरारी, कांदा उत्पादक शेतकरी.

Onion plants that have turned yellow due to ripening due to rain without hail & Thunderstorms and showers
Onion Prices Hike : शेतकऱ्यांना मोठा दिलासा! कांद्याचा दर वधारला; जुना कांदा 5,500 तर नवीन 4,500 रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.