Onion-Potato Producers Union Election: 15 जागांसाठी 48 उमेदवार रिंगणात; सोमवारपासून माघारी

Election
Electionesakal
Updated on

नाशिक : जिल्हा कांदा-बटाटा उत्पादक सहकारी संघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, प्राप्त झालेल्या अर्जांची गुरुवारी (ता. ३०) छाननी झाली. निवडणूक अधिकारी मनीषा खैरनार यांनी शुक्रवारी (ता. १) अंतिम मतदार यादी जाहीर केली आहे.

यात १५ जागांसाठी ४८ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. सोमवार (ता. ४)पासून माघारीला सुरवात होईल. १८ डिसेंबर ही अंतिम मुदत आहे. माघारीनंतरच लढतीचे अंतिम चित्र स्पष्ट होईल. (Onion-Potato Producers Union Election 48 candidates in fray for 15 seats Back from Monday nashik)

जिल्हा कांदा-बटाटा उत्पादक सहकारी संघाच्या १५ जागांसाठी एकूण १०५ अर्ज दाखल झाले होते. प्राप्त झालेल्या अर्जांची गुरुवारी निवडणूक अधिकारी खैरनार यांच्या अध्यक्षतेखाली छाननी झाली. यात संस्था, सोसायटी गटातून सर्वाधिक २७ अर्ज बाद झाले आहेत. अवैध अर्ज ठरल्यावर शुक्रवारी ४८ उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध झाली आहे.

यात, संस्था व सोसायटी गटात सात जागांसाठी नऊ, वैयक्तिक सभासद गटात तीन जागांसाठी सहा, महिला राखीव दोन जागांसाठी सात, अनुसूचित जाती-जमाती गट एका जागेसाठी दोन, इतर मागासवर्गीय गट (ओबीसी) एका जागेसाठी १८, तर विशेष मागासवर्गीय गट (एनटी) एका जागेसाठी सहा उमेदवार रिंगणात आहेत.

सोमवारपासून माघारीला सुरवात होणार असून, १८ डिसेंबरपर्यंत मुदतीसाठी कालावधी दिलेला आहे.

Election
NAMCO Bank Election: बिनविरोध निवडणुकीची शक्यता मावळली! 21 जागांसाठी विक्रमी 272 उमेदवारी अर्ज दाखल

ओबीसी गटात मोठी चुरस

ओबीसी गटात सर्वाधिक १८ उमेदवार रिंगणात आहेत. संस्था सोसायटी गटाबरोबर अनेकांनी ओबीसीतूनही अर्ज दाखल केलेले होते. संस्था सोसायटी गटातून अनेकांचे अर्ज अवैध ठरले आहेत. त्यामुळे आता ओबीसीतून अनेकांनी लढण्याची तयारी केली आहे.

यात नेमकी कशी लढत होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या गटातून अद्वय हिरे, अपूर्व हिरे, संदीप गुळवे, राजेंद्र डोखळे, रत्नाकर चुंभळे, आत्माराम कुंभार्डे, भाऊसाहेब ढिकले आदींचे अर्ज आहेत.

Election
Students Online Attendance: ‘स्विफ्ट चॅट’चा पहिल्या दिवशी फज्जा! माहिती भरण्यात अनेक अडचणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.