Nashik News: अमरनाथच्या बाबा बर्फानींना कांद्याचा प्रसाद! 5 किलो कांदे देवापुढे ठेऊन केली प्रार्थना

Farmer Sanjay Sathe standing with onion outside Baba Amarnath's cave.
Farmer Sanjay Sathe standing with onion outside Baba Amarnath's cave.esakal
Updated on

Nashik News : जम्मू-काश्मीर राज्यातील प्रसिद्ध देवस्थान व पवित्र गुंफा म्हणून बाबा अमरनाथ व तेथील यात्रोत्सव देशात व देशाबाहेर प्रसिद्ध आहे. नैताळे येथील कांदा उत्पादक शेतकरी संजय साठे यांनी स्वतःच्या घरून पाच किलो कांदे घेऊन अमरनाथ यात्रेचा प्रवास सुरु केला.

तब्बल सहा दिवसाच्या प्रवासानंतर तो पाच किलो कांदा बाबा अमरनाथ (बाबा बर्फानी ) यांना प्रसाद म्हणून अर्पण केला. देशभरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांतर्फे कांद्याला योग्य भाव मिळू दे..

कांदा आयात निर्यातीचे योग्य धोरण ठरविण्यास केंद्र व राज्य सरकारला सुबुद्धी दे, अशी प्रार्थना करून तो कांद्याचा प्रसाद तेथे उपस्थित असलेल्या व देशसेवेसाठी रात्र दिवस पहारा करणाऱ्या सैनिकांना दिला. (Onion Prasad to Baba Barfani of Amarnath Onion producers from naitale offer five kilos of onions to god Nashik)

अमरनाथ यात्रा १ जुलै २०२३ पासून सुरु झाली आहे. नैताळे येथील कांदा उत्पादक शेतकरी संजय साठे हेही अमरनाथ यात्रेसाठी गेले आहे. जाताना त्यांनी सोबत पाच किलो कांदे घेऊन बाबा बर्फानीच्या गुफेसमोर असलेल्या दानपेटीला स्पर्श करून कांदा पुजाऱ्यांनी परत दिला.

तेच कांदे साठे यांनी तेथे यात्रेकरूंच्या संरक्षणासाठी भारतीय लष्करी जवानांसाठी एका जवानाकडे सुपूर्त केले श्री साठे यांनी अमरनाथ (बाबा बर्फानीकडे) अशी इच्छा व्यक्त केली. वर्षभरापासून कांद्याला भाव नाही, उत्पादन खर्च भेटत नाही, शेतकरी कर्जबाजारी होत आहे.

शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळावे यासाठी केंद्र व राज्य सरकारने लक्ष द्यावे. सुबुद्धी द्यावी. अनेक जण देवापुढे पेढ्याचा प्रसाद ठेवतात हारगुच्छ वाहतात, मी पण माझ्या शेतात रात्रंदिवस कष्ट करून पिकवलेले कांदे सर्व भारतीय शेतकऱ्यांतर्फे अमरनाथ गुंफेत ठेवून देशासाठी रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून सीमेवर पहारा देतात अशा जवानांना ते दिले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Farmer Sanjay Sathe standing with onion outside Baba Amarnath's cave.
Nashik Water Crisis: गतवर्षी ओव्हरफ्लो, यंदा अत्यल्प साठा; पालखेड 35 टक्के, तिसगाव कोरडेठाकच!

सुरक्षारक्षकांनी साठे यांना गुफेत कांदे नेण्यास विरोध केला होता परंतु साठे यांनी सांगितले, की इतर लोक त्यांच्या श्रद्धेप्रमाणे प्रसाद ठेवतात, त्यानुसार माझी श्रद्धा आहे, की मी माझ्या शेतात पिकवलेले कांदे प्रसाद म्हणून आणले आहे, तेव्हा चेक करून त्यांनी परवानगी दिली.

बाजीराव अभंग, दिलीप घायाळ, श्रीकांत मंडलिक, दिलीप निकम, पवन वाकचौरे, संतोष घायाळ, ज्ञानेश्वर देसले, गणेश जेऊघाले इत्यादी शेतकरी उपस्थित होते.

Farmer Sanjay Sathe standing with onion outside Baba Amarnath's cave.
Nashik: दिंडोरी पेठमधील कामांवरील स्थगिती उठविली! 173 कोटींच्या विकासकामांना झिरवाळांच्या प्रयत्नांनी मंजुरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.