Onion News: कांद्याच्या दराची वाटचाल 4 हजारांकडे! पिंपळगावला प्रतिक्विंटल 3 हजार 960 एवढा उंच्चाकी दर

Onion auction going on in Pimpalgaon Baswant Bazaar Committee on Wednesday.
Onion auction going on in Pimpalgaon Baswant Bazaar Committee on Wednesday.esakal
Updated on

पिंपळगाव बसवंत : मागणीपेक्षा पुरवठा कमी झाल्याने पिंपळगाव बाजार समितीत कांद्याच्या दरात मोठी उसळी आली. मंगळवार (ता. १७)च्या तुलनेत बुधवारी (ता. १८) तब्बल प्रतिक्विंटल पाचशे रुपयांनी कांद्याचे भाव वधारले.

लाल कांदा बाजारात दाखल होण्यास अजून महिन्याभराचा अवधी असल्याने उन्हाळ कांद्याचे बाजारभाव चार हजार रुपयांकडे झेपावले आहेत.

येथील बाजार समितीत वर्षभरातील सर्वाधिक तीन हजार ९६० रुपये प्रतिक्विंटलला दर मिळाला. (Onion price moves towards 4 thousand 3 thousand 960 per quintal for Pimpalgaon nashik)

गेल्या दोन महिन्यांपासून केंद्र शासनाच्या कांद्याचे धोरण व दरावरून शेतकरी व शेतकरी संघटनांनी रान उठविले होते. ४० टक्के निर्यातशुल्क लागू करून कांद्याला अप्रत्यक्ष निर्यातबंदीच्या जोखंड्यात केंद्र शासनाने बांधले होते.

‘नाफेड’कडून कांदा खरेदीचा दिखावा करण्यात आला. यावरून आंदोलनाचे भडके उडाले. कांद्याच्या दराची तेजी रोखण्यासाठी आदळआटप झाली.

Onion auction going on in Pimpalgaon Baswant Bazaar Committee on Wednesday.
Nashik Onion Crop News: नामपूरला कांद्याची उसळी! विक्रमी 25 हजार क्विंटल आवक

त्यातच व्यापाऱ्यांनी बंद पुकारला, पण उत्पादन कमी, आगामी लाल कांद्याला बाजार येण्यास अवधी असल्याने दरात मोठी उसळी आली आहे. येथील बाजार समितीत बुधवारी उन्हाळ कांद्याची १३ हजार ५०० क्विंटल आवक झाली.

किमान दोन हजार ५०० रुपये, तर कमाल तीन हजार ९६०, तर सरासरी तीन हजार ४०० रुपये प्रतिक्विंटला दर मिळाला. कांद्याचा साठा संपल्यानंतर दरवाढ झाल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, पालखेड उपबाजारात गुरुवारी (ता. १८) सभापती आमदार दिलीप बनकर व संचालक मंडळाच्या उपस्थितीत मका, सोयाबीन व भुसार शेतीमालाच्या लिलावाचा प्रारंभ होणार आहे.

Onion auction going on in Pimpalgaon Baswant Bazaar Committee on Wednesday.
Nashik Onion News: लासलगावला कांदा @3555 रुपये! सरासरी 3250 रुपये प्रतिक्विंटल भाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.