Nashik Onion Rate : कांद्याच्या दरात 725 रुपयांची घसरण; ऐन सणासुदीच्या तोंडावर बळीराजा हतबल

Arrival of summer onion held on Wednesday at the premises of Agricultural Produce Market Committee.
Arrival of summer onion held on Wednesday at the premises of Agricultural Produce Market Committee. esakal
Updated on

Nashik Onion Rate : पुढील आठवड्यात दिवाळीनिमित्त बाजार समिती बंद असल्याने व सणासुदीला हातात दोन पैसे राहावेत, यासाठी शेतकऱ्यांनी कांदा विक्रीस आणल्याने पर्यायाने आवक वाढल्याने कांद्याच्या दरात ७२५ रुपयांनी घसरण झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

पुढील आठवड्यापासून जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती दिवाळीनिमित्त बंद राहणार असल्याचे मेसेज व्हायरल होत असल्याने जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या आवकेत वाढ होत आहे. केंद्र सरकारने दोन दिवसांपूर्वी कांद्याच्या किमान निर्यातमूल्य दरात आठशे डॉलर प्रतिदराने वाढ केल्याने जवळपास निर्यात ठप्प झाली आहे. (Onion prices fall by Rs 725 due to increase in arrival nashik news)

‘नाफेड’ने साठवणूक केलेला दोन लाख टन कांदा किरकोळ बाजारात २५ रुपये प्रतिकिलो दराने विक्री सुरू झाल्याने त्याचा परिणाम कांद्याच्या दरावर झाला आहे. दोन दिवसांत कांद्याच्या दरामध्ये सरासरी ७२५ रुपयांची घसरण झाल्याचे दिसून आले. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी उन्हाळ कांद्याला सरासरी चार हजार २०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.

२७ ऑक्टोबरला उन्हाळ कांद्याला सरासरी चार हजार ९२५ दर मिळाला होता. जिल्ह्यात रोज साधारणत: एक लाख क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक होत असून, पाच दिवसांत पाच लाख क्विंटल उन्हाळ कांद्याची जिल्हाभरात आवक झाली आहे. भाव तुटल्याने शेतकऱ्यांना जवळपास ३६ कोटी रुपयांचा तोटा बसल्याचे दिसून येत आहे.

स्थानिक बाजारपेठांमधील कांद्याचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी कांद्यावरील निर्यातमूल्य दर ८०० डॉलर प्रतिटन करण्याचा निर्णय केंद्राकडून घेण्यात आला आहे.

Arrival of summer onion held on Wednesday at the premises of Agricultural Produce Market Committee.
Onion Export Duty : कांदा निर्यातीवर अघोषित बंदी? निर्यातमूल्य डॉलर 800 वाढ

किरकोळ बाजारात कांद्याने साठ रुपये किलोचा दर ओलांडल्याने केंद्राने धसका घेत ग्राहकांना दिलासा देण्यासाठी कांदा निर्यातमूल्य दरात ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत तब्बल ८०० रुपये डॉलर प्रतिटन केल्याने निर्यात जवळपास ठप्प झाली.

दुसरीकडे केंद्राने ग्राहकांना दिलासा देण्यासाठी शुक्रवारी किरकोळ बाजारातील कांद्याची विक्री ‘बफर स्टॉक’मधून २५ रुपये प्रतिकिलो या सवलतीच्या दराने करण्याचा निर्णय घेतला. ग्राहक व्यवहार मंत्रालय नॅशनल कन्झ्युमर को-ऑपरेटिव्ह फेडरेशन ऑफ इंडिया आणि नॅशनल अॅग्रिकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून दोन लाख टन कांदा किरकोळ बाजारात पाठविण्यास सुरवात झाली आहे.

दरम्यान, लासलगाव कृषी उतपन्न बाजार सामितीच्या आवारात उन्हाळ कांद्याला कमीत कमी दोन हजार, सरसरी चार हजार २०० जास्तीत जास्त चार हजार ८९९ रुपये असा भाव मिळाला. लाल कांद्याला कमीत कमी एक हजार ६००, सरसरी तीन हजार २००, जास्तीत जास्त चार हजार २०० भाव मिळाले.

Arrival of summer onion held on Wednesday at the premises of Agricultural Produce Market Committee.
Nashik Onion Rate: नामपूर बाजार समितीत उन्हाळ कांद्याला 5 हजार 505 रुपयांचा सर्वोच्च भाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.