Nashik Onion News : कांदा व्यापाऱ्यांनी पुकारलेला संप १३ दिवसांनी मिटल्यानंतर मंगळवारी (ता. ३) पहिल्याच दिवशी उन्हाळ कांद्याचे दर घसरले.
जिल्ह्यातील महत्त्वाच्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सरासरी दोन हजार रुपये भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. (Onion prices fell on first day nashik onion news)
लिलाव सुरू होत असल्याचे कळताच मंगळवारी बाजार समितीत उन्हाळ कांद्याची आवक वाढली. सर्वाधिक कांदा विंचूर व लासलगाव बाजार समितीत दाखल झाल्याचे दिसून आले. येथे सरासरी दोन हजार रुपये भाव मिळाला.
किमान दर ८०० रुपये ते जास्तीत जास्त दोन हजार ५४१ रुपयांपर्यंत भाव मिळालेला असला, तरी अडीच हजारांवर दर मिळण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. व्यापाऱ्यांनी स्वत:च्या गुदामातील कांदा संपविल्यावर लिलाव सुरू केले. त्यामुळे आता खरेदी सुरू झालेली दिसत असली, तरी त्याचा फारसा लाभ होत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे.
"लिलाव सुरू झाल्यावर शेतकऱ्यांना तीन हजार रुपयांपर्यंत दर मिळणे अपेक्षित होते. पण, त्यांची निराशा झाली. व्यापाऱ्यांनी बंद करून शेतकऱ्यांचे नुकसान केले." - भारत दिघोळे, अध्यक्ष, महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटना
बाजार समित्यांमधील परिस्थिती
बाजार समिती....आवक (क्विं.)....किमान दर......कमाल दर....सरासरी
नाशिक..............२,९२९................६००............२,३००.............२,०००
लासलगाव..........११,७३०............८००...........२,५४१.............२,०५०
निफाड................५,०४०...............८७१...........२,३००.............२,०००
विंचूर...................१७,९५२............१,०००.......२,५००.............२,०५०
सिन्नर................३९६................५००..........२,३५०..............२,०००
कळवण..............९,१००..............८००.........२,५५५..............२,१००
मनमाड.............१,५००..............५००..........२,३५०..............२,०००
बागलाण..........७,७८०..............६००............२,५००.............२,१००
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.