Nashik Onion Rates: मुंगसे उपबाजारात कांद्याला सातशे ते बावीसशेच भाव! 10 हजार क्विंटल कांद्याची आवक

Onion News
Onion Newsesakal
Updated on

Nashik Onion Rates : येथील बाजार समितीच्या मुंगसे उपबाजारात कांद्याची आवक काही प्रमाणात घटली आहे. सोमवारी ९ हजार ७०० क्विंटल तर मंगळवारी (ता.१२) जवळपास १० हजार क्विंटल कांद्याची आवक होती.

गेल्या आठवड्याच्या तुलनेने भाव दोनशे रुपयांनी घसरले आहेत. मंगळवारी बाजारात कांदा कमीत कमी ७०० तर जास्तीत जास्त २ हजार २५० रुपये क्विंटलने विकला गेला. सरासरी बाजारभाव १ हजार ७०० रुपये होता. (Onion prices in Mungse sub market seven hundred to twenty two hundred only Import of 10 thousand quintals of onion nashik)

गेल्या महिन्यापासून सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक वाढली होती. आठवड्यापासून आवक कमी होवू लागली आहे. त्यातच भावातदेखील घसरण होत आहे. मुंगसे बाजारात सोमवारी (ता. ११) ९ हजार ७९८ क्विंटल कांदा विक्रीसाठी आला होता.

भाव कमीत कमी ६०५ तर जास्तीत जास्त २ हजार २५१ रुपये होता. सरासरी बाजारभाव १ हजार ९७० रुपये होता. बहुतांशी कांद्याला १ हजार ते १५०० रुपये दरम्यान भाव मिळत आहे. काही शेतकऱ्यांनी कांदा चाळींमध्ये राखून ठेवला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Onion News
Onion Subsidy: कांदा अनुदानाचा पहिला हप्ता खात्यात वर्ग होण्यास सुरवात

शेतकऱ्यांना अजूनही भाववाढीची अपेक्षा आहे. कर्नाटकमधील नवीन कांदा बाजारात येवू लागल्यामुळे भाव घसरल्याचे सांगितले जाते. यावर्षी पावसाअभावी खरीप हंगाम वाया गेला आहे. पोळा सण दोन दिवसावर आला आहे.

सणासुदीसाठी तसेच बैलांचा साज व इतर खर्चासाठी पैशांची गरज असल्याने शेतकरी कांदा विक्रीसाठी आणत आहेत.

Onion News
Onion Crisis: कांद्याला भाव न मिळाल्याने शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.