उन्हाळ घसरला, ग्राहकांची लाल कांद्याला पसंती

onion
onionesakal
Updated on

लासलगाव (जि. नाशिक) : शेतकऱ्यांच्या दृष्टीने कांदा नगदी पीक असले, तरी तेवढेच बेभरवश्याचे झाले आहे. गेल्या आठ दिवसांपासून उन्हाळ कांदा दरात चढउतार पहायला मिळत आहे. सोमवार (ता. २९) कालच्या तुलनेत मंगळवारी (ता. ३०) उन्हाळ कांदा दरात १५० रुपयांची घसरण पाहायला मिळाली, तर लाल कांदा दरात सरासरी ६०० रुपयांची वाढ दिसून आली. येथील बाजार समितीत उन्हाळ कांद्याला सरासरी एक हजार ५५१ रुपये प्रतिक्विंटल, तर लाल कांद्याला सरासरी एक हजार ८५१ रुपये भाव मिळाला.

शेतकऱ्यांच्या पदरी निराशा

दक्षिणेकडील तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तसेच कर्नाटकात अवकाळी पावसाचा तडाखा नवीन कांद्याला बसला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कांद्याची मागणी वाढत आहे. बाजारात सध्या नवीन लाल कांद्याची कमी प्रमाणात आवक सुरू आहे. महाराष्ट्रातील कांदा चवीला उत्कृष्ट असल्याने देशात आणि देशाबाहेर मागणी असते. महाराष्ट्रासह कर्नाटक, गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणात कांदा लागवड केली जाते. दक्षिणेकडील राज्यात तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यात कांदा लागवड केली जाते. तेथील कांदा स्थानिक पातळीवरील गरज भागवितो. मध्यंतरी झालेल्या मुसळधार पावसामुळे तमिळनाडू, आंध्र प्रदेश व कर्नाटकातील काही भागात कांद्याचे नुकसान झाले आहे.

onion
ढगाळ हवामानाने द्राक्षनगरी हबकली | Nashik

सध्या बाजार समितीत उन्हाळ कांदा विक्रीस येत आहे. मात्र, उन्हाळ कांदा सात ते आठ महिन्यांचा झाल्याने त्याच्या प्रतवारीत कमालीची घट झाली आहे, तर दुसरीकडे चांगला भाव मिळेल, या आशेने साठवलेल्या कांद्याला ७०० ते एक हजार ५५१ रुपये भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशा दिसत आहे.

दरम्यान, लासलगाव बाजार समितीत मंगळवारी ९५४ वाहनांमधून १५ हजार ५६३ क्विंटल कांद्याची आवक झाली. त्यात उन्हाळ कांदा ३६५ नंतर लाल कांदा ५२८ नग बाजारात दाखल झाले. उन्हाळ कांदा कमीतकमी भाव ७०० रुपये, जास्तीत जास्त भाव एक हजार ९५१ रुपये, तर सरासरी भाव एक हजार ५५१ रुपये होता, तर लाल कांद्याला कमीतकमी भाव ८०० रुपये, जास्तीत जास्त भाव तीन हजार २५१ रुपये, तर सरासरी भाव एक हजार ८९१ रुपये होता.

onion
'त्या' चिमुकलीच्या शरीरात धडधडू लागले 41 वर्षीय शेतकऱ्याचे हृदय!

''लाल कांदा मोठ्या प्रमाणात बाजारात दाखल झाल्यामुळे उन्हाळ कांद्याची मागणी कमी झाली आहे. ग्राहकांनी नवीन कांद्याला पसंती दिली आहे. त्यातच नाफेडने एक लाख मेट्रिक टन व इराणकडून आयात झालेला कांदा एकाच वेळी बाजारात दाखल झाल्याने देशांतर्गत मागणी कमी झाली. त्यात जानेवारीमध्ये रांगडा (लेट खरीप) बाजारात दाखल झाल्यानंतर जुन्या उन्हाळ कांद्याची मागणी कमी होईल.'' - नरेंद्र वाढवणे, सचिव, बाजार समिती, लासलगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.