लासलगाव (जि.नाशिक) : गेल्या काही दिवसांपासून संततधार तर कधी मुसळधार पावसामुळे दक्षिणेकडील आंध्रप्रदेश आणि कर्नाटक राज्यांमधून नवीन लाल कांदा उशिराने बाजारात दाखल होणार आहे. नाशिक जिल्ह्यासह राज्यातील शेतकऱ्यांनी चाळीत साठवून ठेवलेला उन्हाळ कांदा (onion) खराब होत असल्याने मागणी आणि पुरवठा यात तफावत निर्माण झाली आहे. यामुळे कांद्याच्या (onion) बाजारभावात (lasalgaon market committee) एकाच दिवसात २३० रुपयांची वाढ झाली.
दोन महिन्यानंतर तेजी, मात्र बदलत्या वातावरणामुळे शेतकऱ्यांना फायदा तसा कमीच
लासलगाव येथील कृषी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (lasalgaon market) उन्हाळ कांद्याच्या दरामध्ये एका दिवसात दोनशे तीस रुपयाची वाढ पाहायला मिळाली. उन्हाळ कांद्याला कमाल २१३० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. भावामध्ये वाढ दिसत असली तरी शेतकऱ्यांनी मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये चाळीमध्ये कांदा साठवून ठेवलेल्या कांद्यावर बदलत्या वातावरणामुळे परिणाम होऊन त्याच्या वजनात आणि प्रतवारीमध्ये कमालीची घट येत असल्याने वाढलेल्या भावाचा शेतकऱ्यांना फारसा फायदा होताना दिसत नाही. उन्हाळ कांद्याला २१२० रुपये इतका कमाल बाजार भाव मिळाला आहे. २९ जुलै रोजी उन्हाळ कांद्याला २०२० रुपये भाव मिळाला होता, त्यानंतर कांद्याच्या बाजारभावात सातत्याने घसरण झाली होत होती, मात्र पावणेदोन महिन्यानंतर पुन्हा उन्हाळ कांदा लासलगाव बाजर समितीत मंगळवारच्या तुलनेत दोन हजार रुपये पार झाला आहे.
चौदा हजार क्विंटल आवक
लासलगांव कृषी उत्पन्न बाजार समिती ९११ वाहनातून १४ हजार ७६ क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक झाली होती, त्याला कमाल २१२० रुपये, किमान ८०० रुपये तर सर्वसाधारण १९८० रुपये इतका प्रतिक्विटंलला बाजार भाव मिळाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.