Nashik News: ढगाळ वातावरणामुळे कांदा उत्पादक संकटात? रोगाची भीती अन् महागड्या औषधांमुळे बळिराजा चिंतित

Drug spraying done to prevent disease on onion due to cloudy weather.
Drug spraying done to prevent disease on onion due to cloudy weather.esakal
Updated on

बिजोरसे (जि. नाशिक) : राज्यासह जिल्ह्यात आठवड्याभरापासून ढगाळ हवामानामुळे थंडीचा पारा घसरला आहे. यामुळे बागलाण तालुक्यातील काटवन व नामपूर परिसरात कांदा उत्पादक पुन्हा एकदा तयार झालेल्या ढगाळ वातावरणामुळे चिंतित झाले आहे. अशा वातावरणा पिके वाचविण्यासाठी त्याची धडपड सुर झाली आहे.

रोगांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांकडून महागडी औषधांची फवारणी करत पिके वाचविण्याचा अतोनात प्रयत्न केला जात आहे. मात्र यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन बिघडले आहे. (Onion producers in trouble due to cloudy weather Baliraja worried due to fear of disease and expensive medicines Nashik News)

जिल्ह्यात पाच ते सहा दिवसांपासून वातावरण ढगाळ होत आहे. यातच कधी दवबिंदू, करपा रोगामुळे कांद्याच्या रोपांवर मररोग होऊन आता ते पातळ झाले आहे. यामुळे ही रोप जगविण्यासाठी महागडी औषधे फवारली जात आहे.

मात्र वातावरणातील बदलामुळे त्याचा देखील फायदा होत नसल्याचे बळिराजाची चिंता वाढली आहे. यातच कांद्याला चांगला बाजारभाव कमी आहे. मात्र ते पुन्हा वाढतील व कर्जाचा डोंगर कमी होईल या आशेवर पुन्हा शेतकरी कांदा पीक लावण्यासाठी तयार झाला पण वातावरण आता साथ देत नसल्याने तो पुन्हा चिंतेत अडकला आहे.

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

Drug spraying done to prevent disease on onion due to cloudy weather.
Nashik News : नांदगावला आहार मदतनीस कर्मचाऱ्यांचा ठिय्या; 7 महिन्यापासून थकले आहार अनुदान!

गहू, हरभरावर मर रोगाचा प्रादुभार्व

गेल्या महिन्यात ढगाळ वातावरणाची स्थिती निवळत असल्याने बळिराजाला दिलासा मिळाला होता. पण पुन्हा काही दिवसापासून ढगाळ वातावरणामुळे कांदा पिक वाचविण्याची धडपड सुरु आहे.

वातावरणाच्या अचानक बदलामुळे गहू, हरभरा या पिकावर देखील मर रोगाचा प्रादुर्भाव आढळत आहे. औषध फवारणी करत असतानाच त्याचाही उपयोग जाणवत नाही. महागडी औषधे आणून कांदा, गहु, हरभरा, डाळिंब पीक वाचवण्याचा प्रयत्न फोल ठरल्यास बळिराजाला मोठे आर्थिक संकट सोसावे लागणार आहे.

Drug spraying done to prevent disease on onion due to cloudy weather.
Nashik News : सरपंचानंतर आता उपसरपंचांच्या निवडणुकीकडे नागरिकांच्या नजरा; सोमवारी होणार निवडीचे घोषणा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.