NAFED Onion Purchase : केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी दोन लाख टन कांदा दोन हजार ४१० रुपये प्रतिक्विंटलने खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता.
मात्र, गुरुवारी (ता. ३१) ‘नाफेड’च्या कांदा खरेदी केंद्रावर कांद्याला प्रत्येक क्विंटल दोन हजार २७४ रुपये इतकाच दर जाहीर झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. (Onion purchase from NAFED for Rs 2274 Huge anger among farmers in Lasalgaon market committee nashik)
दुसरीकडे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत काही प्रमाणात कांद्याचे दर वाढल्याचे दिसले. मात्र, ‘नाफेड’ने कांदा दर वाढविण्याऐवजी १२४ रुपये प्रतिक्विंटरने दर कमी केल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे.
केंद्र सरकारने ‘नाफेड’मार्फत दोन हजार ४१० रुपये प्रतिक्विंटलने कांदा खरेदी केला जाईल, असे जाहीर केले आहे. मात्र, आठ ते दहा दिवसांमध्येच त्यांनी कांदा खरेदीचा दर कमी करत दोन हजार २७४ रुपये प्रतिक्विंटल केल्याने फसवणूक झाल्याचे शेतकऱ्यांमध्ये बोलले जात आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
गुरुवारी सुरवातीला ‘नाफेड’च्या केंद्रावर ठरलेल्या दरात कांदा खरेदी या अपेक्षेने शेतकऱ्यांनी आपला माल तेथे विक्रीला नेला. मात्र, काही काळानंतर कांद्याच्या दरात तफावत झाल्याने उर्वरित शेतकऱ्यांनी आपला माल बाजार समितीच्या मुख्य आवारात विकण्यास देणे पसंत केले.
तथापि, गुरुवारी कमी दरात खरेदी केलेल्या कांद्याचे उशिरापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार विक्री झालेल्या कांद्याला दोन हजार ४१० रुपयांप्रमाणेच शेतकऱ्यांना पैसे अदा केले जातील, असे समजते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.