Nashik Onion News : कांदा साठवण क्षमता 50 हजार टनांनी वाढणार; कांदा चाळ उभारण्याच्या 27 प्रस्तावांना मंजुरी

Onion News
Onion Newsesakal
Updated on

किरण कवडे ः सकाळ वृत्तसेवा

Nashik Onion News : कांद्याच्या दरावरून ‘सारे रान’ पेटलेले असताना आता जिल्ह्याच्या साठवण क्षमतेत ५० हजार मेट्रीक टनाने वाढ होणार आहे. कृषी विभागाच्या ‘आत्मा’ या विभागाने जिल्ह्यातील कांदा चाळीचे २७ प्रस्ताव मंजूर केले आहेत.

त्यातून येत्या वर्षभरात ही क्षमता वृद्धी होणार आहे. (onion storage capacity of district will increase by 50 thousand metric tons nashik news)

नाशिक जिल्ह्यात अडीच लाख हेक्टरवर कांद्याची लागवड केली जाते. त्यातून ७० लाख मेट्रीक टन कांद्याचे उत्पादन होत असून, ५० ते ५४ लाख मे. टन हा उन्हाळी कांदा असतो. खरीप व लेट खरीप (लाल) कांद्यात साठवण क्षमता नसल्याने तो त्वरित बाजारात विक्रीसाठी आणला जातो. मात्र, उन्हाळी कांदा चाळींमध्ये साठवला जाऊ शकतो.

त्याला योग्य भाव मिळाल्यानंतर तो बाजारात आणला जातो. ‘नाफेड’ किंवा ‘एनसीसीएफ’ या संस्थांकडून कांदा खरेदी केला जातो. कांद्याची गुणवत्ता राखण्यासाठी कांदा चाळींची आवश्यकता असते. नाशिक जिल्ह्यात खासगी व व्यापाऱ्यांच्या मिळून साधारणत: ५६ हजार कांदा चाळीमध्ये १२ लाख मेट्रीक टन कांदा साठवला जातो.

उर्वरित ४० ते ४२ लाख मे.टन कांदा साठवण क्षमतेअभावी बाजारात आहे, त्या भावात विकला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. याचा विचार करून ‘आत्मा’ने बाळासाहेब ठाकरे व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) योजनेंतर्गत कांदा चाळींचे प्रस्ताव मागवले होते. त्यासाठी जिल्ह्यातून ३४ प्रस्ताव प्राप्त झाले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Onion News
Nashik Onion News: नामपूरला कांद्याची विक्रमी आवक! सरासरी 22 रूपयांचा भाव

यातून २७ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. येत्या वर्षभरात या चाळी उभ्या राहतील आणि ५० हजार मेट्रीक टन कांदा यात साठवला जाणार आहे. फार्मर प्रोड्युसर कंपन्यांची क्षमता वाढल्याने ‘नाफेड’मार्फत दरवर्षी कांद्याची मागणी वाढत चालली आहे. गेल्या तीन लाख मेट्रीक टन तर यंदा पाच लाखावर ही मागणी गेल्याने शेतकऱ्यांना याचा निश्चितपणे फायदा होईल.

कृषी सभापतींनी मांडला मुद्दा

जिल्ह्यातील कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी जिल्हा परिषदेचे तत्कालीन कृषी सभापती संजय बनकर यांनी कांदा चाळींची संख्या वाढवण्यासाठी राज्य सरकारकडे मागणी केली होती. या मागणीच्या आधारे कांदा चाळींच्या क्षमतेत आता वाढ झाल्याचे दिसून येते.

"प्रस्ताव मंजूर असलेल्या संस्थांना प्रशिक्षण देवून लवकर कांदा चाळी उभ्या करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या चाळी उभ्या राहिल्यानंतर साठवण क्षमता वाढेल आणि त्याचा शेतकऱ्यांना निश्चितपणे फायदा होईल." - राजेंद्र निकम, प्रकल्प संचालक, ‘आत्मा’, नाशिक.

Onion News
Onion News: ‘नाफेड’पेक्षाही बाजार समितीत कांद्याला जादा भाव! पैसे तत्काळ मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.