Onion Subsidy : सहकार विभागाच्या उपनिबंधक कार्यालयातर्फे जिल्ह्यातील एक लाख ७२ हजार १५२ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ४३५ कोटी ६१ लाख २३ हजार ५७८ रुपये वर्ग करण्यासाठी आयसीआयसीआय बँकेच्या संकेतस्थळावर याद्या ‘अपलोड’ करण्याचे काम बुधवारी (ता. ३०) उशिरापर्यंत सुरू होते.
हे कामकाज विभागासह बाजार समित्यांचे सचिव आणि कर्मचारी करत होते, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक फयाज मुलाणी यांनी दिली. (Onion subsidy of 436 crore by cooperative department Class work on account of farmers till late nashik news)
राज्यात फेब्रुवारी २०२३ च्या सुरवातीला कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात घसरण झाली होती. शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी सहकारी आणि खासगी बाजार समित्या, थेट पणन परवानाधारक अथवा ‘नाफेड’कडे १ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२३ ला विकलेल्या लेट खरीप कांद्याला अनुदान देण्याचा निर्णय सरकारने २७ मार्च २०२३ ला घेतला.
क्विंटलला ३५० रुपयेप्रमाणे २०० क्विंटलपर्यंत अनुदान सरकारने जाहीर केले. त्याअनुषंगाने ३ ते ३० एप्रिलला शेतकऱ्यांकडून प्रस्ताव मागविण्यात आले. प्रस्तावाची तपासणी सरकारी लेखापरीक्षक यांच्यातर्फे करण्यात आली. त्यानंतर आता शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट अनुदान वर्ग करण्याची प्रक्रिया जिल्हा उपनिबंधक कार्यालयातर्फे सुरू आहे.
कांदा अनुदान वर्गसाठी ‘अपलोड’ची माहिती
बाजार समिती शेतकरी अनुदान ‘अपलोडिंग' पूर्ण
संख्या रुपयांमध्ये शेतकरी संख्या रक्कम रुपये
मनमाड ७,३७१ १७ कोटी ४२ लाख ७,३४४ १६ कोटी ८७ लाख
चंदनपुरी मल्हारश्री १,३८५ दोन कोटी २८ लाख १,३४० दोन कोटी २६ लाख
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
मालेगाव कृषिरत्न १४ दोन लाख तीन हजार १४ दोन लाख तीन हजार
मालेगाव नारी सन्मान चार ४७ हजार ७७५ चार ४७ हजार ७७५
मालेगाव जयकिसान राजा १८ तीन लाख नऊ हजार १८ तीन लाख नऊ हजार
नांदगाव महाकिसान वृद्धी ११८ ३१ लाख ४० हजार ११८ ३१ लाख ४० हजार
नांदगाव ११,६७८ ३१ कोटी १५ लाख ११,५७२ ३० कोटी ७४ लाख
निफाड मनकामेश्वर २८९ ४८ लाख ८१ हजार २८७ ४८ लाख सहा हजार
सटाणा ६,३२८ १५ कोटी १८ लाख ६,२४४ १४ कोटी ९३ लाख
लासलगाव ३०,३९५ ७५ कोटी ५३ लाख ३०,१८६ ७४ कोटी ७७ लाख
चांदवड ९,८६८ २५ कोटी ५० लाख ९,७७२ २५ कोटी १६ लाख
देवळा महाकिसान वृद्धी १०४ १५ लाख ९० हजार ८९ १३ लाख ५१ हजार
देवळा महास्वराज्य फेडरेशन ३६१ ५६ लाख ९४ हजार ३५४ ५४ लाख ५९ हजार
लासलगाव दिनकर गांगुर्डे परवाना ३६५ दोन कोटी ३४ लाख ३३४ दोन कोटी १४ लाख
देवळा महागिरणा ॲग्रो ५९ सहा लाख ४१ हजार ५९ सहा लाख ४१ हजार
सिन्नर ७,६२९ १८ कोटी ६८ लाख ७,०३२ १७ कोटी ३५ लाख
दिंडोरी ३,५१८ आठ कोटी नऊ लाख ३,१२२ सात कोटी १७ लाख
येवला १४,९०० ४१ कोटी ९३ लाख
९,३९१ २५ कोटी ६९ लाख
कळवण ३,४२९ आठ कोटी ८० लाख ३,३२२ आठ कोटी ७३ लाख
मालेगाव १३,५०५ २५ कोटी ७१ लाख १३,०९० २४ कोटी ७८ लाख
नाशिक २,२२० चार कोटी चार लाख १,७९३ तीन कोटी आठ लाख
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.