Nashik News: कांदा अनुदान, दरप्रश्‍नी नेत्यांना गावबंदी! मुंजवाड ग्रामस्थांचा ग्रामसभेत निर्णय

At Munjwad, villagers and activists started the protest movement by throwing onions and village ban on the leaders.
At Munjwad, villagers and activists started the protest movement by throwing onions and village ban on the leaders.esakal
Updated on

Nashik News : राज्य शासनाने अवकाळी व गारपीटग्रस्त शेतकऱ्यासाठी जाहीर केलेले कांदा अनुदान प्रत्येकाच्या बँक खाती जमा होईपर्यंत व नाफेडतर्फे दोन हजार रूपये क्विंटल दराने कांदा खरेदी सुरू होईपर्यंत आमदार, खासदार व कोणत्याही राजकीय पुढऱ्यांना मुंजवाड (ता. बागलाण) गावात गावबंदी करण्यात आली आहे.

कुणी जर प्रवेश केला तर त्यावर कांदाफेक आंदोलन छेडणार असल्याचा संतप्त इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. (Onion subsidy village ban to questionable leaders Decision of Munjwad Villagers in Gram Sabha Nashik News)

मुंजवाड ग्रामस्थांनी आज ग्रामसभा घेऊन शासनविरोधी घोषणाबाजी करीत गावबंदीचा निर्णय जाहीर केला. अवकाळी पाऊस व गारपीट या अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील कांदा आधीच खराब झाला होता, तरीही शेतकऱ्यांनी मोठ्या हिमतीने तो चाळीत साठवला, परंतु त्याला अवकाळीचा फटका बसल्यामुळे तो सडू लागला आहे.

कांदा अनुदानाची फक्त घोषणाच झाली, अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाली नाही, कोणताही राजकीय पक्ष शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलायला तयार नाही, त्यामुळे अशा पुढाऱ्यांना वेशीवरच रोखून जाब विचारण्याची वेळ आली आहे असा ग्रामस्थांचा सूर होता.

आज रविवार (ता.२१) पासून आमदार, खासदार मंत्री, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांनी मुंजवाड गावात प्रवेश करू नये. केल्यास त्यांच्यावर कांदा फेकून निषेध केला जाईल असा ठराव शेतकरी क्रांती मोर्चा, कांदा उत्पादक शेतकरी संघटना व मुंजवाड ग्रामस्थांनी केला.

लवकरच मुंजवाड ग्रामपंचायतीचाही तसा ठराव करून शासनास पाठविणार असल्याचे ग्रामसभेत सांगण्यात आले. आज गावाच्या चारही दिशांना राजकीय पुढाऱ्यांना प्रवेश बंदचे (गांवबंदी) फलक लावण्यात आले आहेत.

सध्या कोणत्याच शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी मेटाकुटीस आलेला आहे. टोमॅटो, मिरची, कोबी, कोथंबिर, मेथी जुडी रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आली आहे. देशाची अर्थव्यवस्था शेतकऱ्यांच्या हातात असून शेतकऱ्यांचीच दयनीय अवस्था झाली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

At Munjwad, villagers and activists started the protest movement by throwing onions and village ban on the leaders.
Health: आदीवासींचा कल्पवृक्ष आरोग्यासाठीही गुणकारी; मोहाच्या बियांपासून बनविलेल्या तेलाचा आहारात वापर

अशाच पद्धतीने महाराष्ट्रातील सर्व गावकऱ्यांनी राजकीय पुढाऱ्यांना गांवबंदी केल्याशिवाय पर्याय नाही. राजकीय पुढाऱ्यांनी शासनाला जाब विचारण्याची गरज आहे,नव्हे ते त्यांचे काम आहे मात्र तेच दुर्लक्ष करीत असल्याने आता त्यांना गावत फिरकू देणार नाहीत असा एकमुखी नारा शेतकरी क्रांती मोर्चाचे अध्यक्ष केशव सूर्यवंशी यांनी लावला.

भिकाजी जाधव, वैभव आहिरे, नानाजी जाधव, महेंद्र जाधव,उमेश खैरनार, विनोद जाधव, भगवान जाधव, भास्कर बागुल, योगेश जाधव, काशिनाथ जाधव आदींसह मुंजवाड गावातील सर्व कांदा उत्पादक शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.

"केंद्र सरकारने नाफेडमार्फत तीन लाख टन कांदा खरेदी करण्यात येईल असे सांगितले, मात्र आजपर्यंत कोणतीही कार्यवाही होताना दिसत नाही. कांदा अनुदान जाहीर होऊन दीड- दोन महिने उलटूनही शेतकऱ्याच्या बँक खाती दमडीही जमा झालेली नाही. सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या पुढाऱ्यांना जाब विचारण्याची वेळ आली आहे."

- कुबेर जाधव, संपर्कप्रमुख, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना.

At Munjwad, villagers and activists started the protest movement by throwing onions and village ban on the leaders.
Deola Bazar Samiti : देवळा बाजार समितीची उद्या सभापती निवड प्रक्रिया

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()