Onion Subsidy: कांदा अनुदान बँक खात्यात होणार वितरित! आमदार दिलीप बनकर यांची माहिती

onion subsidy
onion subsidyesakal
Updated on

Onion Subsidy : येथील उत्पन्न बाजार समितीत १७ हजार १४६ पात्र कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ५१ कोटी, ३५ लाख, १८ हजार ११० रुपयांचे अनुदान शासनाकडून वितरित होणार आहे, अशी माहिती बाजार समितीचे सभापती तथा आमदार दिलीपराव बनकर यांनी दिली. (Onion subsidy will be distributed to bank account Information of MLA Dilip Bankar nashik)

फेब्रुवारीच्या सुरवातीस कांद्याच्या बाजारभावात झालेली मोठी घसरण विचारात घेता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याच्या दृष्टीने राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या, खासगी बाजार समितीच्या, थेट पणन अनुज्ञप्तीधारकांकडे अथवा नाफेडकडे १ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२३ यादरम्यान लेट खरीप हंगामातील लाल कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ३५० रुपये अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला.

त्यानुसार पात्र लाभार्थी शेतकऱ्यांचे प्रस्ताव तालुका सहाय्यक निबंधकांनी तपासून जिल्हा उपनिंबधकांकडे सादर केले. जिल्हा उपनिंबधकांनी पात्र प्रस्तावांची छाननी करून ती यादी पणन संचालकांना मान्यतेसाठी सादर केली.

पणन संचालकांनी तपासून अंतिम केलेल्या यादीनुसार पणन विभागातर्फे अनुदान थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.

राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वितरित करावयाच्या एकूण अनुदानाची रक्कम ८४४ कोटी, ५६ लाख, ८१ हजार ७७५ रुपये आहे. मात्र, शासनाने ४६५.९९ कोटींची रक्कम उपलब्ध करून दिल्याने १० कोटींपेक्षा कमी अनुदानाची मागणी असलेल्या १३ जिल्ह्यांतील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना संपूर्ण अनुदानाची रक्कम वितरित होणार आहे.

१० कोटींपेक्षा जास्त अनुदानाची मागणी असलेल्या १० जिल्ह्यातील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना ५३.९४ टक्के या प्रमाणात अनुदानाची रक्कम वितरित होणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

onion subsidy
Nashik Rain Crisis: पाऊसच नसल्याने कांदा लागवड संकटात! चांदवड, येवला, नांदगाव, मालेगाव, देवळा पट्टा अडचणीत

त्यानुसार नाशिक जिल्ह्यासाठी सुमारे ४३५ कोटी ६१ लाख, २३ हजार ५७८ इतका निधीची आवश्यकता आहे.

त्यापैकी नाशिक जिल्ह्यासाठी शासन निर्णयानुसार ५३.९४ टक्के म्हणजेच सुमारे २३४ कोटी ९६ लाख, ९३ हजार, ५८ इतका निधी वितरित होणार आहे. उर्वरित ४६.०६ टक्के म्हणजेच २०० कोटी ६४ लाख, ३० हजार ५२० इतका निधी पुढील टप्यात वितरित करण्यात येणार आहे.

पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये प्रस्ताव दाखल केलेल्या रब्बी, खरीप, उन्हाळ कांदा व ७/१२ उताऱ्यावर कांदा पिकाची नोंद नसलेल्या तथापि तलाठी, कृषी सहाय्यक व ग्रामसेवकांचा संयुक्त अहवाल प्राप्त झालेल्या १७१४६ पात्र कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मंजूर झाले असून, त्याची एकूण रक्कम ५१ कोटी, ३५ लाख, १८ हजार ११० रुपये आहे.

शासन निर्णयानुसार ५३.९४ टक्के प्रमाणात अनुदानाची रक्कम लवकर पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याची माहिती पिंपळगाव बसवंत बाजार समितीचे सभापती तथा आमदार दिलीपराव बनकर यांनी दिली.

onion subsidy
Nashik News: बॅनरबाजीमुळे झाकले दिशादर्शक फलक!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.