Onion Traders Protest: कांदा व्यापाऱ्यांच्या बंदमुळे आर्थिक उलाढाल ठप्प!

6 दिवसांमध्ये सुमारे लाखो क्विंटलपेक्षा अधिक कांद्याची आवक थांबली
The onion kept in the chali is rotten farmer's family picking onions
The onion kept in the chali is rotten farmer's family picking onionsesakal
Updated on

मनमाड : कांदा व्यापाऱ्यांनी बंद पुकारल्यामुळे सलग सहा दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव ठप्प आहेत. या सहा दिवसांमध्ये सुमारे लाखो क्विंटलपेक्षा अधिक कांद्याची आवक ठप्प झाली आहे.

त्यामुळे सुमारे कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल ठप्प झाली आहे. कांद्याचे भाव आज ना उद्या वाढतील, या आशेने शेतकऱ्यांनी चाळीत साठवलेला कांदा पावसाच्या धारेने सडू लागला आहे.

कांदाकोंडीमुळे शेतकरी हैराण झाले असून, अजून किती दिवस लिलाव बंद ठेवणार, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहे. (Onion Traders Protest Due to strike of onion traders economic turnover stopped nashik)

कांदा व्यापाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी नाशिक जिल्हा व्यापारी असोसिएशनकडून बंद पुकारण्यात आला आहे. लिलाव बंद झाल्यापासून जिल्ह्याच्या विविध भागांत पावसाची धार सुरू आहे.

त्यामुळे कष्टाने पिकवलेल्या उन्हाळ कांद्याचे भाव आज ना उद्या वाढतील या आशेने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कांदा चाळीत कांदा साठवून ठेवला आहे. कांदा जिल्ह्यातील प्रमुख नगदी पीक आहे.

मात्र चार महिने होत आल्याने ऐन विक्री करण्याच्या वेळी कांदा व्यापाऱ्यांनी बंद पुकारला, तर पाऊस सुरू झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. चाळीतील कांद्याला शेतकऱ्यांनी पलटी मारत पुन्हा कांदा चाळींमध्येच साठविला होता.

पडणारा पाऊस कांद्याचे होत्याचे नव्हते करत आहे. वाढलेल्या अद्रतेमुळे कांद्याला कोम फुटू लागले आहेत. त्यामुळे चाळीतील कांदा बाहेर काढून कांदे निवडायचे अन् पुन्हा भरण्याचे काम शेतकरी कुटुंबाला करावे लागत आहे.

रोजंदारीने रोजांदर लावले तर यासाठी मोठी मेहनत अन् मजुरी देखील मोजावी लागते. मात्र या सर्व प्रक्रियेत कांद्याची प्रतवारी घसरून वजन घटत आहे. बाजार समित्या बंद असल्यामुळे कांदा चाळीतच ठेवला तर तो सडू लागला आहे.

The onion kept in the chali is rotten farmer's family picking onions
Onion Traders Protest : राज्यातील व्यापारी 26 नंतर बंदमध्ये सहभागी होणार! लिलाव बंदचा कांदा व्यापाऱ्यांचा निर्णय

सडलेला कांदा उकिरड्यावर फेकावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. पावसाची धार सुरू असल्याने कांदा खराब होतो. विक्रीला नेण्यासाठी बाजार समित्या बंद आहे. याशेतकरी कात्रीत सापडला आहे.

सहा दिवसांपासून लिलाव ठप्प असल्याने जिल्ह्यात रोज लाखो क्विंटल कांद्याच्या आवकेतून कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. बैठका निष्फळ ठरत आहे. सहा दिवस झाले तर शासन लक्ष द्यायला तयार नाही तर व्यापारी मागण्यांवर अडून बसले आहेत.

"सहा दिवस झाले कांदा लिलाव बंद आहे. व्यापाऱ्यांचा हा बंद असाच सुरू राहिला, तर कांदा उत्पादक शेतकरी देशोधडीला लागेल. एकीकडे व्यापाऱ्यांचा बंद नडत आहे, तर दुसरीकडे निसर्ग कांदा सडवत आहे. दोघांमध्ये शेतकरी हवालदिल झाला आहे. शासनाने शेतकऱ्यांची समस्या जाणून मार्ग काढावा नाही तर यावर तोडगा काढावा."- श्रावण सांगळे, शेतकरी

The onion kept in the chali is rotten farmer's family picking onions
Nashik News: बागलाणच्या पश्चिम पट्ट्यातील कर्टुले बाजारात दाखल! आरोग्यदायक रानभाजीला ग्राहकांची पसंती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.