नाशिक : राज्यातील ITI मध्ये ऑनलाइन प्रवेश

ITI
ITIesakal
Updated on

कनाशी (जि. नाशिक) : राज्यातील शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज (Online application) प्रक्रियेस प्रारंभ झाला आहे. राज्यातील ४१९ शासकीय व ५५३ खासगी आय टी आय मध्ये एकूण १ लाख ४९ हजार २६८ जागांसाठी प्रवेश प्रक्रिया (Admission Process) राबविण्यात येत आहे. (Online admission in ITI in state Nashik News)

आयटीआयमध्ये प्रवेश घेण्याकडे दरवर्षी विद्यार्थ्यांचा ओढा वाढत आहे. यावर्षी दहावीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने प्रवेशाचे ऑनलाइन वेळापत्रक जाहीर केले आहे.

ITI
Nashik : डिप्‍लोमा प्रवेश अर्जाची 30 जूनपर्यंत मुदत

नाशिक मधील सातपूर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत २३ व्यवसाय अभ्यासक्रमांच्या २२०० जागांसाठी तर त्र्यंबकनाका औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची) येथे ११ व्यवसाय अभ्यासक्रमांच्या ४३० जागांसाठी प्रवेश दिले जाणार आहे. एकूण चार फेऱ्यांमध्ये प्रवेश प्रक्रिया पार पडणार आहे.

सर्व आयटीआयमध्ये अर्ज स्वीकृती केंद्र असून या केंद्रावर विद्यार्थी ऑनलाइन अर्ज भरणे, पडताळणी, स्वीकृती व निश्चिती करू शकतील. प्रवेशाचा सर्व तपशील माहितीपुस्तिका संकेतस्थळावर डाऊनलोड सेक्शन मध्ये आहे. प्रवेश पद्धती व नियमांचा अभ्यास करून विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज भरावा. माध्यमिक शाळेत व्यवसाय शिक्षण हा विषय घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के आरक्षण ठेवण्यात आले आहे.

ITI
Nashik : जिल्हा परिषदेचा 50 लाखांचा निधी गायब?

विद्यार्थ्यांनी ऑनलाइन प्रवेश अर्ज http://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर भरावा.

आयटीआय प्रवेश वेळापत्रक

ऑनलाइन अर्ज भरणे, अर्जात दुरुस्ती करणे : प्रारंभ १७ जून

प्रवेशअर्जांची निश्चिती करणे : प्रारंभ २२ जून

खुल्या प्रवर्गातील विद्यार्थी: १५० रुपये

राखीव प्रवर्गातील विद्यार्थी: १०० रुपये

राज्याबाहेरील विद्यार्थी: ३०० रुपये

अनिवासी भारतीय विद्यार्थी: ५०० रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.