Nashik ZP News: रस्त्यांच्या दर्जासाठी ऑनलाइन ॲप! कामाच्या प्रत्येक टप्प्यावर राहणार नजर

ZP CEO Ashima Mittal, Nashik News
ZP CEO Ashima Mittal, Nashik Newsesakal
Updated on

Nashik ZP News : जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून केल्या जाणाऱ्या कामांच्या दर्जाबाबत नाराज असलेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी जिल्हा परिषदेच्या रस्त्यांच्या कामांच्या दोष निवारणाचा कालावधी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

आता हा कालावधी तीन वर्षे करण्याचा, तसेच रस्त्यांच्या कामांच्या दर्जावर नियंत्रण ठेवण्यासाठी जलजीवन मिशनप्रमाणे ऑनलाइन ॲप तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. (Online App for Road Quality Every step of work will be monitored Nashik ZP News)

श्रीमती मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (ता. २८) सर्वसाधारण सभा झाली. गत आठवड्यात श्रीमती मित्तल यांनी केलेल्या रस्ते पाहणीचे पडसाद सभेत उमटले.

श्रीमती मित्तल यांनी बांधकाम विभागाकडून केल्या जात असलेल्या कामांच्या दर्जाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. बांधकाम विभागाने रस्त्याचे काम केल्यानंतर त्या रस्त्याचा दोष निवारण कालावधी हा सध्या दोन वर्षांचा आहे.

या दोन वर्षांच्या काळात त्या रस्त्याबाबत काही दोष निर्माण झाल्यास ठेकेदाराने त्यांची दुरुस्ती करणे बंधनकारक असते. मात्र, कोणत्याही ठेकेदाराने या कालावधीत रस्त्यावर खड्डे पडल्यास त्याची दुरुस्ती केलेली दिसत नाही.

या दोष निवारण कालावधीच्या नियमाचे बांधकामकडून कधीही पालन केले जात नाही. यामुळे श्रीमती मित्तल यांनी हा कालावधी वाढवून तो तीन वर्षे करण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे निविदा प्रसिद्ध करताना त्यात या बाबीचा समावेश करण्याच्या सूचना त्यांनी सभेत दिल्या.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

ZP CEO Ashima Mittal, Nashik News
Nashik News: कामगिरीच्या आधारे मॉडेल स्कूलचे मूल्यांकन : ZP CEO आशिमा मित्तल

ग्रामीण भागातील रस्त्यांच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित होत असल्याने निकृष्ट रस्त्यांना आळा घालण्यासाठी श्रीमती मित्तल यांनी बांधकाम विभागाकडून केल्या जात असलेल्या कामांची प्रगती समजावी, यासाठी जलजीवन मिशनच्या कामांप्रमाणे एक ॲप तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्या ॲपमध्ये पाणीपुरवठा योजनांच्या प्रत्येक टप्प्यावरील कामाचे फोटो, व्हिडिओ अपलोड होतात. यामुळे त्या कामासाठी वापरलेल्या वस्तूंचा दर्जा समजतो. काम पूर्ण झाल्यानंतर त्याचेही फोटो टाकले जातात.

अधिकाऱ्यांनी या कामाला भेट देऊन तपासणी केल्यानंतर त्यांचेही व्हिडिओ अपलोड केले जातात. त्याच पद्धतीने बांधकामकडून केल्या जाणाऱ्या प्रत्येक कामाचे प्रत्येक टप्प्यावरील व्हिडिओ, छायाचित्र अपलोड करता येतील, असे अॅप तयार करण्याच्या सूचना त्यांनी सभेत दिल्या.

हे ॲप तयार करण्याची जबाबदारी कार्यकारी अभियंता शैलजा नलावडे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. सभेत ९२ विषय मांडण्यात आले होते. त्यातील ९१ विषयांना मंजुरी देण्यात आली. सभेला उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांसह सर्व विभागप्रमुख हजर होते.

ZP CEO Ashima Mittal, Nashik News
Jalgaon ZP CEO News : ‘फाईल ट्रॅकिंग सिस्‍टीम’ नागरिकांसाठीही खुली करणार! : जि. प. सीईओ अंकित

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.