Online Fraud : पोलिस निरीक्षकालाच बसला ऑनलाईन गंडा

Online Fraud
Online Fraudesakal
Updated on

जुने नाशिक : पोलिस निरीक्षकास २२ हजारास फसविल्याची घटना सोमवारी (ता. ५) उघडकीस आली. याबाबत भद्रकाली पोलिस ठाण्यात तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Online Fraud
इथे ना लाईट, ना रस्ते; महाराष्ट्रपेक्षा गुजरात सोईस्कर! आदिवासींची सार्वत्रिक भावना

पोलिस निरीक्षक विकास वाघ यांना २५ ऑगस्टला कामानिमित्त मुंबई येथे जावयाचे होते. त्यासाठी त्यांनी ‘रेंट अ कार’ वेबसाइटवर जाऊन इंडिया ट्रॅव्हल लॉगिन केले. त्यानंतर त्यांना दीपककुमार शर्मा नावाने फोन आला. त्याच्या मोबाईलवरून श्री. वाघ यांच्या मोबाईलवर व्हॉट्स ॲप माध्यमातून इंडिया ट्रॅव्हल ॲपची लिंक आली. शर्मा याने ते ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यांनी ॲप डाऊनलोड करून ॲपवर त्यांचा डेबिट कार्ड नंबर टाकला. त्यावर एक ओटीपी आला. त्यांनी तो ओटीपी त्यास दिला नाही.

हेही वाचा: शेतमजूर ते कॅनाॅल मॅन...जाणून घ्या एक यशोगाथा....

Online Fraud
Vasant More: वसंत मोरेंचं काय होणार? अजित पवारांच्या ऑफरनंतर मनसे दोन दिवसांत घेणार भूमिका

तरीदेखील त्यांच्या खात्यावरून २२ हजार ७६५ रुपये अनोळखी खात्यावर वर्ग झाले. पुन्हा त्यांना दोन वेळेस ओटीपी क्रमांक आला. शंका आल्याने त्यांनी बँक मॅनेजरला त्यांचे डेबिट कार्ड बंद करण्याचे सांगितले. त्यामुळे खात्यातील अन्य रक्कम सुरक्षित राहिली. पोलिस अधिकाऱ्यांबरोबर अशा प्रकारची फसवणूक झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.