Nashik Water Shortage : जिल्ह्यातील धरणांत 23 टक्केच जलसाठा; मृग, रोहिणी गेले कोरडे

gangapur dam
gangapur damesakal
Updated on

Nashik Water Shortage : यंदा मॉन्सूनपूर्व वळवाचा पाऊस तर झाला नाहीच, शिवाय मॉन्सूनही रेंगाळला असून, मृग व रोहिणी नक्षत्रही कोरडे गेल्याने जमिनीतील उष्णता बाहेर काढणाऱ्या पावसाची अद्यापही प्रतिक्षा आहे.

या साऱ्या परिस्थितीमुळे जिल्ह्यात, राज्यात सर्वाधिक ५७ टँकरद्वारे ४६ गावे आणि ५२ वाड्यांची तहान भागवावी लागत आहे. त्यातच, जिल्ह्यातील धरणांमध्ये आता केवळ २३ टक्के जलसाठा शिल्लक आहे. (Only 23 percent water storage in dams in district nashik news)

दरम्यान, इगतपुरीच्या ग्रामीण कृषी हवामान केंद्रातर्फे बुधवारपासून (ता. २१) पाच दिवस जिल्ह्यातील काही भागात हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पुढील पाच दिवस हवामान ढगाळ राहणार असून, कमाल तापमान ३२ ते ३४ आणि किमान २२ ते २४ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.

वाऱ्याचा वेग ताशी २३ ते २५ किलोमीटर राहण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. सद्यस्थितीत पाऊस हा मॉन्सूनपूर्व असून, खरीपातील पेरण्यांसाठी शेतकऱ्यांनी मॉन्सूनची वाट पाहावी, असा सल्लाही या केंद्रातर्फे देण्यात आला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

gangapur dam
Nashik Encroachment: गोदाकाठी अतिक्रमणांची गर्दी; महापालिकेचे दुर्लक्ष, पूररेषा तपासण्याच्या सूचना

मॉन्सूनचे आगमन झाल्यावर सलग तीन ते चार दिवस पुरेसा म्हणजेच ६५ ते १०० मिलीमीटर पाऊस झाल्यावर आणि जमिनीला वापसा आल्यावर खरीपाची पेरणी करावी, असेही केंद्रातर्फे स्पष्ट करण्यात आले.

जिल्ह्यातील धरणांमध्ये गेल्यावर्षी याच कालावधीत २५ टक्के जलसाठा होता. सद्यस्थितीत जिल्ह्यातील काही धरणांमधील जलसाठ्याची टक्केवारी अशी : गंगापूर- ३२, पालखेड- ३६, ओझरखेड- २५, दारणा- २०, मुकणे- ३८, चणकापूर- २८, हरणबारी- ३५, केळझर- ३४, गिरणा- २३, पूनंद- ३४. तसेच जिल्ह्यात ५७ टँकरद्वारे मागील आठवड्यातसुद्धा ४६ गावे आणि ५२ वाड्यांना पाणीपुरवठा करण्यात आला आहे. गेल्यावर्षी जूनच्या तिसऱ्या आठवड्यात ९२ गावे आणि १६१ वाड्यांना ८५ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता.

gangapur dam
Sport Guide Recruitment : राज्यात 153 क्रीडा मार्गदर्शकांची ‘साई’च्या धर्तीवर बाह्यस्त्रोतद्वारे भरती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.