Kharif Season: जिल्ह्यात जूनअखेरपर्यंत केवळ 594 हेक्टरवर पेरणी; 10 तालुक्यांत अद्यापही पेरण्यांची प्रतिक्षा

Kharif Season Sowing
Kharif Season Sowingesakal
Updated on

Kharif Season : मृग नक्षत्रात दडी मारुन बसलेला मॉन्सून आर्द्रामध्ये अवतरला आहे. गेल्या तीन-चार दिवसांत राज्यसह जिल्ह्यात मॉन्सूनचा पाऊस झाल्याने ओल मिळालेल्या भागात शेतकऱ्यांनी खरीप पेरण्या सुरू केल्या आहेत.

जिल्ह्यातील खरीप हंगामासाठी निश्‍चित केलेल्या सहा लाख ५८ हजार ९१ हेक्टर क्षेत्रापैकी आतापर्यंत फक्त ५९४ हेक्टर म्हणजेच केवळ ०.०९ टक्के पेरण्या झाल्या आहेत.

त्यासुद्धा मालेगाव, नांदगाव, पेठ, सुरगाणा व येवला या पाच तालुक्यातच झाल्या असून, अन्य दहा तालुक्यांमध्ये पेरण्यांची प्रतिक्षा आहे. ( Only 594 hectares sown by June end in district Still waiting for Kharif Season sowing in 10 taluka monsoon nashik)

बिपरजॉय चक्रीवादळाने पाऊस इतका कमकुवत होईल, अशी अपेक्षा नव्हती. या चक्रीवादळाने आर्द्रता घटल्याने मान्सून सुरू होण्यास उशीर झाला. जूनच्या अखेरच्या आठवड्यात राज्यासह जिल्ह्यात मॉन्सूनचे आगमन झाले.

जिल्ह्यात विशेषत: ग्रामीण भागात मॉन्सूनने दमदार हजेरी लावली आहे. पाऊस लांबल्याने खरीप पेरण्याही लांबणीवर पडल्या होत्या. मात्र, पावसाचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांनी पेरण्यांना सुरवात केली आहे.

जिल्ह्यात जूनअखेर केवळ ५९४ हेक्टरवर झालेल्या पेरण्यांमध्ये मालेगाव तालुक्यात ३७० हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. त्यात ३०५ हेक्टरवर कापूस, तर ६५ हेक्टरवर मका पीकाची लागवड झाली आहे.

नांदगाव तालुक्यात १४२ हेक्टरवर पेरण्यांची नोंद झाली असून, यात १०१ हेक्टरवर कापूस तर, ४१ हेक्टरवर मका, सुरगाण्यात सहा हेक्टरवर भात, पेठमध्ये ९ हेक्टरवर भाताची आवणी झाली आहे. तर, येवला तालुक्यात ६७ हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत.

यात १४ हेक्टरवर बाजरी, २४ हेक्टरवर मका आणि २९ हेक्टरवर मुग लागवड झाली आहे. दरम्यान, उर्वरित नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्‍वर, दिंडोरी, कळवण, देवळा, बागलाण, चांदवड, निफाड, सिन्नर या दहा तालुक्यांमध्ये पेरण्यांची अद्याप प्रतिक्षा आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Kharif Season Sowing
Kharif Season: कृषी पंढरीमध्ये सर्वदूर खरीपासाठीच्या पेरणीलायक पावसाची प्रतीक्षा!

गत आठवड्यात पावसाचे आगमन झाले असून, जिल्ह्यात आतापर्यंत १८ मि. मी. पाऊस झाला आहे. त्यामुळे या आठवड्यात पेरण्यांना वेग येण्याची शक्यता आहे.

कृषी निविष्ठांचा साठा पडून

जिल्ह्यात पेरण्या लांबल्याने कृषी निविष्ठा पडून आहेत. याशिवाय खते व बियाणे घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अद्याप गर्दी केली नाही. जिल्ह्यात खरीप हंगामासाठी शासनाकडुन युरीया, डिएपी, एमओपी, एसएसपी व संयुक्त खतांचे एकुण २.२३ लाख मे. टन आवंटन मंजुर करण्यात आले आहे.

जिल्ह्याकरीता कापुस, भात, बाजरी, ज्वारी, मका, सोयाबीन, भुईमुग, तुर, मुग व उडीद आदी पिकांचे एकुण ८६ हजार ९३१ क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे.

तसेच, कापूस पिकाच्या विविध वाणांचे एकुण एक लाख ३८ हजार ७०० पाकिटांचा पुरवठा जिल्ह्यात झालेला आहे. त्यामुळे जिल्ह्यात खते व बियाणे पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे.

Kharif Season Sowing
Nashik Monsoon Rain: इगतपुरी तालुक्यात जोरदार पाऊस! सलग दुसऱ्या दिवशी हजेरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()