Nashik | रामकुंड नव्हे रामतीर्थ!; गोदावरी सुशोभीकरणाला हवी गती!

Ramtirtha
Ramtirthaesakal
Updated on

नाशिक : स्मार्टसिटीअंतर्गत शहरात विविध प्रकल्प राबविताना सिंहस्थ, तसेच धार्मिक पर्यटनाचे शहर म्हणून ओळख असलेल्या गोदावरी सौंदर्यीकरणाला महत्त्व देताना त्यादृष्टीने कामे सुरू करण्यात आली आहेत. परंतु गोदावरी सुशोभीकरणाचे काम करताना दिरंगाई दिसून येत आहे. एकूण प्रकल्पांचा विचार करता अद्याप केवळ साठ टक्के कामे झाली आहेत.

मार्च २०२३ मध्ये स्मार्टसिटी प्रकल्पांच्या कामांची मुदत संपुष्टात येत असल्याने कामांच्या गतीचा विचार करता दिलेल्या कालावधीत प्रकल्प पूर्ण होतील की नाही, याबाबत साशंकता आहे. (Only 60 percent of work completed of Godavari beautification deadline expired on March 23 Nashik news)

स्मार्टसिटी कंपनीतर्फे शहरात ५१ प्रकल्पांचे नियोजन आहे. त्यात गावठाण विकास व गोदावरी सौंदर्यीकरण प्रकल्प गोदावरी विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. स्मार्टसिटी कंपनीतर्फे गोदावरी सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. पावसामुळे गोदावरीला वारंवार पूर येत असल्याने या कालावधीत सुशोभीकरणाचे काम बंद ठेवण्यात आले होते. आता नियमित कामाला सुरवात झाली आहे. गोदावरी सुशोभीकरणात अहिल्यादेवी होळकर पूल ते टाळकुटेश्‍वर पुलापर्यंतच्या कामांचा जवळपास ७५ टक्के समावेश आहे.

दरवर्षी लाखो भाविक जेथे स्नान करतात, त्या रामतीर्थाचे काम अद्याप हाती घेण्यात आलेले नाही. मार्च २०२३ पर्यंत स्मार्टसिटी कंपनीच्या माध्यमातून सुरू असलेली कामे पूर्ण करण्याच्या सूचना केंद्रीय नगरविकास मंत्रालयाने दिल्या आहेत. सद्यःस्थितीत सुरू असलेल्या कामांची गती लक्षात घेता कामे पूर्णत्वास नेण्याचे मोठे आव्हान स्मार्टसिटी कंपनीसमोर राहणार आहे.

Ramtirtha
Nashik : शहरभर CCTV बसविण्याच्या कामास वेग; संपूर्ण शहर तिसऱ्या डोळ्याच्या कक्षेत

असा आहे गोदा सुशोभीकरणाचा प्रवास

१) गोदावरी स्वच्छतेसाठी ट्रश स्कीमर खरेदी

(२.७१ कोटी रुपये किंमत, काम पूर्ण, फेब्रुवारी २०२० पासून यंत्र कार्यान्वित)

२) गोदावरी नदीपात्रातील गाळ काढणे (३.२ किलोमीटर)

(प्रकल्प किंमत ६.८२ कोटी रुपये प्रकल्प पूर्ण)

३) गोदावरी नदीतीरावर मलवाहिन्या टाकणे

(प्रकल्प किंमत ९.४३ कोटी रुपये, ६७ टक्के काम पूर्ण, लेंडीनाला ते गाडगे महाराज पूल मुख्य मलवाहिनीचे काम पूर्ण.)

४) गोदा सुशोभीकरण (पायाभूत सुविधा, नदी पुनरुज्जीवन, घाट सुशोभीकरण)

(प्रकल्पाची किंमत ७३.७४ कोटी रुपये, ६५ टक्के काम पूर्ण)

५) होळकर पुलाजवळील छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे काम पूर्ण

६) गोदा पार्क (रामवाडी) ७५ टक्के काम पूर्ण

७) गोदा वॉक ९५ टक्के काम पूर्ण

८) घाट क्षेत्रातील सुशोभीकरण ७० टक्के काम पूर्ण, इतर कामे प्रगतिपथावर

९) होळकर पुलाजवळ यांत्रिकी गेट बसविणे

(प्रकल्पाची किंमत २६.०२ कोटी रुपये, १० टक्के पूर्ण, प्रकल्पासाठीच्या दरवाजासाठीचे भाग अमेरिकेतून आल्यानंतर काम पुढे सुरू होईल.)

"गोदावरी सुशोभीकरणात काही कामे अपूर्ण असली तरी लवकरात लवकर ती कामे विहित कालावधीत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पावसामुळे कामे बंद होती, ती आता पुन्हा सुरू झाली आहेत." - सुमंत मोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्टसिटी कंपनी

Ramtirtha
PFI Case : मालेगावातील मौलानास ATSकडून अटक; Social Mediaवर चिथावणीखोर संदेश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.