Nashik Agriculture News : रब्बीची अवघी 71 टक्के पेरणी; पर्जन्यमान कमी झाल्याचा परिणाम

गेल्या खरिपात पर्जन्यमान कमी असल्याने खरीप पिकांवर परिणाम होताच. मात्र त्याची धग रब्बी हंगामात अधिक वाढली आहे.
Sowing has been done in the area during Diwali. So the wheat has now grown.
Sowing has been done in the area during Diwali. So the wheat has now grown.esakal
Updated on

Nashik Agriculture News : गेल्या खरिपात पर्जन्यमान कमी असल्याने खरीप पिकांवर परिणाम होताच. मात्र त्याची धग रब्बी हंगामात अधिक वाढली आहे. जिल्ह्याच्या अनेक भागात दुष्काळसदृश परिस्थितीमुळे पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

त्याचा परिणाम रब्बी हंगामात दिसून आला आहे. (Only 71 percent sowing of Rabi nashik agriculture news)

यंदा रब्बीचा पेरा मागील वर्षीच्या तुलनेत २६ टक्क्यांनी कमी झाला आहे. तो यंदा ७१.७४ टक्के इतका आहे. जिल्ह्यात मालेगाव, येवला, सिन्नर हे तालुके दुष्काळी जाहीर करण्यात आले आहेत. चांदवड व नांदगाव तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती आहे. देवळा, बागलाण, नांदगाव, या तालुक्यांतील निम्म्याहून कमी आहे.

मालेगाव, कळवण, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, नाशिक, पेठ, निफाड, चांदवड व इगतपुरी तालुक्यात तो निम्म्यावर आहे. दिंडोरी, येवला व सिन्नर तालुक्यात समाधानकारक स्थिती आहे. सिन्नर दुष्काळी तालुका असूनही अवकाळी पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी जोखीम घेऊन रब्बीचा पेरा केल्याने या तालुक्यात जिल्ह्यातील पेरणी क्षेत्र सर्वाधिक आहे.

खरीप हंगामातील शेत खाली झाल्यानंतर पाण्याच्या उपलब्धतेनुसार रब्बी पेरण्या झाल्या. त्यामुळे सुरवातीच्या टप्प्यात पेरणांचा वेग दिसून आला;मात्र तो नंतर कमी झाल्याचेही पाहायला मिळाले. जिल्ह्यात गहू पेरा सर्वाधिक असतो. मात्र यंदा विहिरीतील पाण्याची उपलब्धता कमी झाल्याने तो यंदा निम्म्यावर आल्याची स्थिती आहे.

निफाड तालुक्यात सरासरीच्या तुलनेत हे क्षेत्र निम्म्याहून कमी झाल्याची स्थिती आहे. दिंडोरी तालुक्यात गहू पेरा सर्वाधिक होऊन सरासरीपेक्षा अधिक क्षेत्र आहे. चारा व धान्य उपलब्धतेच्या अंगाने ज्वारी व मका पिकात वाढ दिसून आली आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाल्याने कडब्याच्या उपलब्धतेच्या अनुषंगाने सिन्नर तालुक्यात ज्वारी वाढली आहे.

Sowing has been done in the area during Diwali. So the wheat has now grown.
Nashik Agriculture News : जिल्ह्यात 3 हजार एकर क्षेत्र बनले सुपीक; बंधाऱ्यांच्या साठवण क्षमतेतही मोठी वाढ

यांसह नांदगाव, येवला व चांदवड तालुक्यात पेरा वाढला आहे. मक्याला मिळणारा भाव व चारा उपलब्धता या अंगाने यंदाही मक्याचे क्षेत्र कायम राहून त्यात वाढ झाल्याचे दिसून आले. येवला व सिन्नर तालुक्यात सर्वाधिक क्षेत्र वाढले आहे. यासह निफाड, मालेगाव व नांदगाव तालुक्यात पेरा आहे. कडधान्य पिकातही हरभरा यंदा सरासरी पेक्षाही कमी आहे

गळीतधान्य पिकांचे क्षेत्र शून्यावर

जिल्ह्यात गळीत धान्यपिकांचे सरासरी क्षेत्र ५६.८ हेक्टर इतके अत्यल्प क्षेत्र आहे. त्यामध्ये करडई,जवस,तीळ व सूर्यफूल ही पिके पूर्वी घेतली जायची. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार यंदा जिल्ह्यात जवळपास या चारही गळीतधान्य पिकांचा पेरा शून्यावर आहे.त्यामुळे दिवसेंदिवस तेलबिया क्षेत्र कमी होऊन हद्दपार होण्याची चिन्ह दिसून येत आहे.

पीक...सरासरी क्षेत्र...पेरणी क्षेत्र(हेक्टर)...टक्केवारी(ता.४ जानेवारी अखेर)

ज्वारी...४,०५४.९८...७,२७५.५...१७८.९८

गहू...६४,१५०.८५...३७,६३१.९२...५८.६६

मका...८,४१८.९...९,३२६.८५...११०.७८

इतर तृणधान्ये ..३१...७.२...२३.२२

हरभरा...३५,०८६.१६...२५,११३.०१...७१.५८

इतर कडधान्ये...१,७६७.३७...२१२२.५५...१२०.११

एकूण क्षेत्र...१,१३,५७६.०६...८१,४७७.२३...७१.७४

Sowing has been done in the area during Diwali. So the wheat has now grown.
Nashik Agriculture News: जिल्ह्यात रब्बीची केवळ 8 टक्के पेरणी; 1 लाख 14 हजार 249 हेक्टर क्षेत्र निश्चित

तालुकानिहाय पेरणी स्थिती:

तालुका...सरासरी क्षेत्र...पेरणी क्षेत्र(हेक्टर)...टक्केवारी

मालेगाव...१२,७७५...६,९११...५४.१

बागलाण...१२,७५७...५,३९०...४२.१५

कळवण...६,२३९...४,९६५...७९.५८

देवळा...१,९५५...४५१...२३.०७

नांदगाव...५,३१३...२,३७१.४...४४.६३

सुरगाणा...३,२४३.६८...२,३३०.४...७१.८४

नाशिक...३,२७८.८४...२,३८७.८...७२.८२

त्र्यंबकेश्वर...१,०८४.९४...६,५८.४...६०.६९

दिंडोरी...१०,१७५.०८...१०,७१४...१०५.३

इगतपुरी...२,६५४.७६...२,०१९.२६...७६.०६

पेठ...१७५७.८४...९२०.६...५२.३७

निफाड...१४८४९.५८...८८८९.२७...५९.८६

सिन्नर...२०६७४.८८...१९२७६...९३.२३

येवला...११३२१.८...१०६५३.४...९४.१

चांदवड...५४९५.६६....३५३९.७...६४.४१..

Sowing has been done in the area during Diwali. So the wheat has now grown.
Nashik Agriculture News: लासलगावला कांदा संवर्धन चाचणी यशस्वी; 250 टन कांदा मोफत विकिरण करून मिळणार

''यंदा पाऊस पाणी कमी होता विहिरींना पण खूप कमी प्रमाणात पाणी असल्याने रब्बी पेरा खूप कमी प्रमाणात आहे.थोड्याफार प्रमाणात रब्बी लाल कांदा तसेच हरभरा व मालदांडी ज्वारी मध्यंतरी डिसेंबरच्या दोन-तीन तारखेला पाऊस झाला त्यावेळेस हरभरा व ज्वारी पिके टाकण्यात आली.सध्या पाण्याचे प्रमाण खूप कमी झाले आहे.''- दादाभाऊ दाभाडे, शेतकरी, माणिकपुंज,ता.नांदगाव

''सगळीकडे पेरा यंदा कमी झालेला आहे पाण्याची परिस्थिती वाईट असल्याने विहिरीला पाणी कमी असल्याने हा फटका आहे.''- मल्हारी जाधव,शेतकरी,जवळके ता.येवला

Sowing has been done in the area during Diwali. So the wheat has now grown.
Nashik Agriculture News : ‘रब्बी’तला बागायतदारांचा जिल्हा हिरमुसला; 59 टक्के पेरणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.