Nashik Agriculture News : जिल्ह्यात रब्बीच्या पेरण्या सुरू होऊनही महिनाभराचा कालावधी उलटला, तरी रब्बीच्या पेरण्यांना वेग आला नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात यंदा रब्बीसाठी एक लाख १४ हजार २४९ हेक्टर क्षेत्र निश्चित केले असून, त्यापैकी आतापर्यंत पाच हजार १७२ हेक्टर क्षेत्रावर (७.४९ टक्के) पेरण्या झाल्या आहेत.
रब्बीचे सर्वाधिक क्षेत्र असलेल्या गव्हाची केवळ एक टक्का पेरणी झाली आहे. मक्याच्या १३ टक्के पेरण्या झाल्या. नाशिक व निफाड तालुक्यांत सर्वाधिक पेरण्या झाल्या आहेत. निम्म्याहून अधिक तालुक्यांत अद्याप शेतातील ढेकळं फुटली नसल्याचे चित्र आहे. (Only 8 percent sowing of rabi in district Nashik Agriculture News)
जूनमध्ये पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांना खरिपाची पेरणी करता आली नव्हती. जुलैच्या शेवटी बऱ्यापैकी पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. त्यानंतर १५ ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र, अपेक्षित पाऊस झाला नसल्याने खरिपाला मोठा फटका बसला. पावसाळ्याच्या चार महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात जवळपास ६० टक्के पाऊस झाला आहे.
धरणांमध्ये ८० टक्के साठा आहे. हा पाऊस सरासरीपेक्षा कमी आहे. त्या अनुषंगाने रब्बी हंगामात एक लाख १४ हजार २४९ हेक्टरवर रब्बीचे पेरणी क्षेत्र आहे. यापैकी आतापर्यंत पाच हजार १७२ हेक्टर पेरणी झाली. केवळ ७.७९ टक्के पेरणी झाली आहे. पाऊस कमी झाल्याने रब्बी पेरणीही १०० टक्के होण्याची शक्यता कमी दिसते.
ज्वारी दोन हजार २७१, गहू ५८ हजार ७९३, हरभरा ३४ हजार १९६, तर मका सात हजार ३९२ हेक्टरवर पेरणीचा अंदाज आहे. प्रत्यक्षात मात्र दोन हजार ३१२ हेक्टरवर ज्वारी, ७१५ हेक्टरवर गहू, १० हजार ६४ हेक्टरवर मका, एक हजार १४ हेक्टरवर हरभरा; तर ६५ हेक्टरवर कडधान्याची लागवड झाली आहे.
गेल्या वर्षी १७ नोव्हेंबर २०२२ अखेर १० हजार ९४७ हेक्टरवर पेरण्या झाल्या होत्या. यंदाच्या निम्म्या क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. थंडी वाढल्याने हरभरा, गहू, ज्वारी पिकांच्या पेरणीला गती मिळण्याचा अंदाज आहे. चाराटंचाईच्या दृष्टीने मका लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल राहणार असल्याचे बोलले जाते.
पेरणीला गती नसल्याने कृषीसेवा केंद्रचालकांकडील ५० टक्केही बियाण्यांची विक्री झालेली नाही. रासायनिक खतांला पेरणीसाठी मागणी केली आहे. पण, उसासह अन्य नदीकाठच्या पिकांसाठी रासायनिक खतांची मागणी आहे.
तालुकानिहाय झालेल्या पेरण्या
कळवण (११.२९ टक्के), नांदगाव (१.६८), सुरगाणा (८.३३), नाशिक (१८.६२), त्र्यंबकेश्वर (१.३२), इगतपुरी (४.२१), निफाड (१५.७७ टक्के). मालेगाव, बागलाण, देवळा, दिंडोरी, पेठ, सिन्नर, येवला, चांदवड तालुक्यांत एक टक्क्याच्या आत पेरण्या झालेल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.