Nashik News : वर्षभरात फक्त 80 मद्यपी वाहनचालक!! कारवाई करण्यात पोलिस उदासीन

मद्यपान करून वाहन चालविणे वाहनचालकाच्याच जिवावर बेतते, तसेच दुसऱ्याच्या जीवाला धोका पोचतो.
Drink & Drive Crime
Drink & Drive Crimeesakal
Updated on

Nashik News : मद्यपान करून वाहन चालविणे वाहनचालकाच्याच जिवावर बेतते, तसेच दुसऱ्याच्या जीवाला धोका पोचतो. त्यामुळे अशा घटना रोखण्यासाठी शासनाने मोठ्या दंडाची तजवीज करतानाच गुन्हा दाखल केला जातो.

परंतु असे असतानाही नाशिक शहर हद्दीमध्ये शहर वाहतूक शाखेला गेल्या वर्षभरात फक्त ८० वाहनचालक मद्यपान करून वाहन चालविताना आढळून आलेले आहे. (Only 80 drunk drivers in year 2023 in nashik city nashik news )

त्यामुळे शहरात मद्यपान करून चालक वाहन चालवीत नाहीत की? पोलिसांना अशी कारवाई करण्यात उदासीनता आहे, असा प्रश्न उपस्थित ‘होतो आहे. मद्यपान करून वाहन चालविताना वाहनचालक आढळून आल्यास, त्यास १० हजार रुपयांचा दंड आणि मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला जातो. तर, राज्यात सर्वाधिक अपघातांमध्ये नाशिक आघाडीवर आहे.

नोव्हेंबर २०२३ अखेरपर्यंत शहरात ४२६ अपघाताच्या घटना घडल्या असून, यामध्ये सर्वाधिक अपघाती मृत्यूमध्ये १०६ दुचाकीचालकांचा समावेश आहे. अपघातांना आळा घालण्यासाठी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाईचे आदेश दिलेले आहेत. त्यानुसार शहर वाहतूक शाखेकडून कारवाई सुरू आहे.

परंतु, गेल्या वर्षभरात ड्रंक ॲण्ड ड्राईव्हची कारवाईमध्ये मात्र वाहतूक शाखेची उदासीनता दिसून आली आहे. गेल्या २०२३ या वर्षभरात मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या ८० जणांविरोधातच कारवाई करण्यात आलेली आहे.

त्यातही सर्वाधिक कारवाई ही जानेवारी व डिसेंबर महिन्यात झालेली आहे. यावरून वाहतूक शाखेकडून ड्रंक ॲण्ड ड्राईव्हची कारवाई करताना उदासीनता असावी अथवा शहरात वाहनचालक मद्यपान करून वाहन चालवित नाहीत असेही म्हणणे धोक्याचेच ठरू शकते.

Drink & Drive Crime
Nashik News : बालगृहे करतात अनाथ मुलांना सकारात्मक ऊर्जा देण्याचे काम : आदिती तटकरे

पाच महिन्यात शुन्य कारवाई

२०२३ या वर्षातील बारा महिन्यांमध्ये शहर वाहतूक शाखेने ८० ड्रंक ॲण्ड ड्राईव्हच्या केसेस केल्या. परंतु या १२ महिन्यापैकी ५ महिन्यांमध्ये एकही ड्रंक ॲण्ड ड्राईव्हच्या केसेस झाल्याची नोंद नाही, याचे आश्चर्य व्यक्त होते आहे.

तर, जानेवारी आणि डिसेंबर या दोनच महिन्यात दोनआकडी संख्येत ड्रंक ॲण्ड ड्राईव्हची कारवाई झालेली आहे. तसेच, गेल्या ३० व ३१ डिसेंबरच्या रात्री २२ ड्रंक ॲण्ड ड्राईव्हच्या केसेसचाही यात समावेश आहे.

पोलिस ठाणेनिहाय ब्रेथॲनेलाईझर

शहर पोलिस वाहतूक शाखेकडे वाहनचालकाने मद्यपान केले आहे की नाही याची चाचणी घेण्यासाठी ६० ब्रेथॲनेलाईझर आहेत. प्रत्येक पोलिस ठाण्यांना दोन याप्रमाणे २६ ब्रेथॲनेलाईझर कारवाई करण्यासाठी वाटप केलेले आहेत. तर, वाहतूक शाखेच्या चार युनिटकडे प्रत्येकी ५ ब्रेथॲनेलाईझर दिलेले आहेत.

यामुळे उदासीनता

मद्यपी वाहनचालक आढळून आल्यास त्यास जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय चाचणीसाठी न्यावे लागते. तेथील अहवाल आल्यानंतर संबंधित वाहनचालकांवर कारवाई केली जाते. परंतु यात पोलिस कर्मचाऱ्यांचा अधिकचा वेळ खर्ची पडतो. या वेळ खाऊ प्रक्रियेमुळे पोलिस बहुतांशी वेळा दंडात्मक कारवाई करतात.

Drink & Drive Crime
Nashik News: शाळकरी मुलाचा पतंग उडविताना मृत्यू; पाडळे गावावर शोककळा

ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह कारवाईची आकडेवारी

महिना............कारवाई

जानेवारी ......३२

फेब्रुवारी ......०४

मार्च....००

एप्रिल....००

मे.....००

जून....०५

जुलै.....०३

ऑगस्ट....००

सप्टेंबर.....०१

Drink & Drive Crime
Nashik News: ट्रॅक्टरच्या धडकेने रेल्वे फाटक बंद! निफाड स्थानकाजवळ दीड तास वाहतुकीचा खोळंबा

ऑक्टोबर....००

नोव्हेंबर....०३

डिसेंबर....३२

एकूण .....८०

''मद्यपान करून वाहन चालविणे म्हणजे स्वत:सह दुसऱ्याच्याही जीवाला धोका उत्पन्न होतो. कारवाई झाली तर संबंधिताला भविष्यात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. वाहतूक शाखेलाही कारवाईच्या सक्त सूचना दिलेल्या आहेत.''- चंद्रकांत खांडवी, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा

Drink & Drive Crime
Nashik News : काळे झेडें दाखविण्याची भीती; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.