Nashik News | पिंगळेंच्या बंद झालेल्या फाईल ओपन करू : दिनकर पाटील, चुंभळे, केदार यांची माहिती

devidas pingale
devidas pingaleesakal
Updated on

सातपूर (जि. नाशिक) : जिल्हा बॅक, नाशिक साखर कारखान्यामध्ये गैरव्यवहारापोटी शेकडो कोटीची वसुलीची कारवाई देविदास पिंगळेंवर आहे. गावोगावच्या मंदिर व चावडीवर त्यांच्याकडून वसुलीची नोटीस लागली आहे. आता पुढील टप्पा हा नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सुमारे पाचशे कोटीपेक्षा जास्त रूपयांच्या घोटाळ्याचे कागदपत्रे इडीला दिली आहेत.

आता आमचे सरकार आले आहे, यांच्या सर्व बंद फाईल ओपन होतील,त्यातून सत्य जनतेला समजेलच असे भाजप नेते दिनकर पाटील, शिवाजी चुंभळे आणि सुनील केदार यांनी आज येथे पत्रकार परिषदेत सांगितले. (open closed file of devidas Pingle Information of Dinkar Patil Chumbhale Kedar at press conference Nashik News)

हिंमत असेल तर देविदास पिंगळेंनी सेन्ट्रल गोदावरी बॅकेत राजीनामा देऊन निवडून लढण्याचे आव्हान दिनकर पाटील यांनी दिले. बाजार समितीच्या निवडणुकीत शिवाजी चुंबळे हेच देविदास पिंगळेंचे कर्दनकाळ ठरतील असा दावाही त्यांनी केला.श्री. पाटील यांच्या शिवाजीनगर येथील निवासस्थानी ही पत्रकार परिषद झाली.

श्री. पाटील यांच्यासह तिघांनी श्री. पिंगळे यांनी केलेले आरोप खोडून काढले. ते म्हणाले,‘ 2009 ते 10 आणि 2012 ते 2021 पर्यतनच्या लेखा परिक्षण अहवालात पिंगळे यांच्यावर विविध बेकायदेशीर कामकाज केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे, त्यात सुमारे पाचशे कोटींपेक्षा जास्त रकमेचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. पिंगळे यांचे सर्व कुटूंबच भ्रष्टाचाराच्या गाळात रूतले आहे.

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

devidas pingale
Nashik News : सकाळ सर्कलसह शहरातील 28 ब्लॅक स्पॉटवर गतिरोधक बसविणार

मागील काळात महाविकास आघाडी सत्तेत असल्यामुळे पिंगळेंविरूध्दची चौकशी बंद केली होती, पण आता आमचे सरकार आल्याने या चौकशीच्या फाईली पुन्हा ओपन होतील, त्यांचा अहवाल लवकरच बाहेर येणार असल्याने यात जनतेला सर्व गोष्टी समजणार आहेत.

यापुढील काळात पैसा व सत्तेचा माज उतरवण्यासाठी माझा लढा अधिक तीव्र करणार आहे. शिवाजी चुंभळे यांनी आजही माझी केस कोर्टात सुरू आहे, पिंगळेंना मागील काळात मिळालेल्या बेकायदा क्लिनचिटविरोधात आम्ही पुन्हा दाद मागू. बाजार समिती निवडणुकीत आम्ही एकत्र पॅनल देऊ.

devidas pingale
Nashik News : 5- 7 मिनिटांच्या अंतरासाठी अर्धा तास!; व्यावसायिकांच्या आशीर्वादाने अतिक्रमणे जोरात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()