नांदगाव (जि. नाशिक) : सगळीकडे शहरीकरणाचे वारे वेगाने वाहत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यास नांदगाव शहर मात्र अपवाद ठरले आहे. शहरात कुठल्याही विकासकामाला चालना देण्यासाठी जागाच शिल्लक नसल्याने जागा शोधण्यासाठी नदीपात्राचा वापर करण्याची वेळ यंत्रणांवर आली आहे. विशेष म्हणजे एकीकडे नद्यांचे अस्तित्व राखण्यासाठी शासकीय पातळीवर उपाययोजनांना अग्रक्रम दिला जात असताना शहरात ठळकपणाने दिसणारा विरोधाभास मात्र बोलका असाच आहे. (Open spaces to found in riverbed Consequences of lack of space in urban planning Nashik News)
कधीकाळी जीवनवाहिन्या ठरलेल्या नद्या वापरल्याशिवाय प्रशासनाला विकासकामे पुढे नेता येत नाही. त्यामुळे कधीकाळी खळखळून वाहणाऱ्या नद्यांचे अस्तित्व आता एखाद्या नाल्यासारखे झाले आहे. तालुक्याच्या भौगालिक नकाशावर असलेल्या नद्या, उपनद्या, ओहोळ, नाले यासंबधातून उपलब्ध शासकीय दस्तावेज कुठे आहे. त्याची साधी माहिती यंत्रणेतील विविध पातळीवरची उदासीनता हा अजून चिंतनाचा वेगळा विषय ठरावा.
नद्या ज्या भागातून वाहतात त्या त्या भागातील ग्रामपंचायती, ग्रामसेवक, तलाठ्यांकडे नेमकेपणाने अद्यावत संग्रहित माहिती नसल्याची बाब यानिमित्ताने पुढे आली आहे. नद्यांची जबाबदारी कुणाकडे, महसूल, पाटबंधारे, लघु पाटबंधारे, नगरपालिका यापैकी कुणाकडे, याचा शोध घेतला असता बहुतांशी घटकांना त्याचे उत्तर देता आले नाही. एक तर अशी विचारणा होते हे बघूनही काहींची त्रेधातिरपीट उडाली. नांदगाव शहरातून शाकांबरी व लेंडी या दोन नद्या वाहतात.
शहराजवळील नांदेश्वरीजवळील पात्रात त्या एकरूप होऊन पुढे त्या पांझण नदीला जाऊन मिळतात. तालुक्याच्या दक्षिण- पूर्व भागातील मालेगाव कऱ्ह्यात येथील डोंगरावरून लोहशिंगवे, भालूर, लक्ष्मीनगर, मांडवड, पाटखाना असा वीस किमीहून अधिकचा नागमोडी प्रवास करीत इदगाह ते शहर असा तीन किमीचा शाकांबरी नदीचा प्रवास असतो. ज्या ठिकाणाहून नदीचा उगम झाला तिच्या पात्राची कमी- अधिक दिसणारी रुंदी नांदगावात अचानक बदलते. लांबीचा हिशेब लावताना तिच्या खोलीचा मात्र लागत नाही.
हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...
तो फक्त तेव्हाच लागतो जेव्हा तिच्या पात्रात विकासकामे सुरु होतात तेव्हा. हीच बाब लेंडी नदीपात्राची. रेल्वे विभागात नदीच्या खोलीचा असलेला तपशील बघता शहरातील नद्यांनी आपली लांबी कायम ठेवताना रुंदी- खोली केव्हाच गमावली असल्याचे लक्षात येते. सध्या या दोन्ही नदीपात्रांना एकीकडे अतिक्रमणांनी वेढा घालत त्यांचा गळा घोटला आहे.
दुसरीकडे शहरीकरण वाढवायचे तर विकासकामांची अपेक्षा व्यक्त करायची, अशी अपेक्षा पूर्ण करण्यासाठी नदीपात्रांना पर्याय म्हणून बघायचे, अशी दुहेरी नीती असल्याने किमान नद्या वाचविण्यासाठी एकच पर्याय दिसतो. तो म्हणजे पालिका नगररचना आराखड्यातील क्षेत्रफळात वाढ करणे.
नद्यांचे अस्तित्व टिकावे
नांदगाव पालिकेच्या स्थापनेला शंभर वर्षे झालीत. अलीकडेच चांदवडला स्थापन झालेल्या नगरपालिका नगरविकास आराखड्याचे क्षेत्रफळ ३२ चौ. किमी एवढे आहे. तर दुसरीकडे नांदगाव शहराचे क्षेत्रफळ अवघे ३.८८ चौरस किमी एवढे आहे. त्यामुळे आज दिसणाऱ्या नद्यांचे अस्तित्व उद्या नाहीसे होण्याला ते एक कारण निमित्त ठरणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.