नाशिक : ब्रिटिश काळापासून चिरेबंदी बांधकामामुळे ऐतिहासिक वास्तूचा दर्जा लाभलेल्या नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वास्तूला दीडशे वर्षे पूर्ण होत असल्याने या वास्तूच्या लौकिकाला साजेसे चिरेबंदी दगडातील प्रवेशद्वाराचे काम पूर्णत्वाकडे आले आहे.
स्मार्ट सिटीअंतर्गत निर्माण केलेले हे प्रवेशद्वार स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त शनिवारी (ता. १३) खुले होणार आहे. (opening of entrance gate of collector office is to be conducted Nashik Latest Marathi News)
स्मार्टसिटीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील स्मार्ट रस्त्यामुळे हा भाग खाली जाऊन रस्ता उंच झाल्याने तत्कालीन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सव असल्याने प्राचिनता उठून दिसावी यादृष्टीने प्रवेशद्वार बांधून देण्याची मागणी केली होती.
स्मार्टसिटी कंपनीकडून दीड वर्ष दगड घडवत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्राचीन वास्तूला शोभेल असे ब्रिटिश आमदनीतील प्रवेशद्वार साकारले आहे. हे प्रवेशद्वार स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त येत्या शनिवार (ता. १३)पासून वाहतुकीसाठी खुले होणार आहे. या कामाची निवासी
उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांच्यासह उपजिल्हाधिकारी गणेश मिसाळ, तहसीलदार राजेंद्र नजन यांनी पाहणी करीत राहिलेली किरकोळ कामे व तत्काळ स्वच्छता करण्याच्या सूचना दिल्या.
प्रवेशद्वारावर लामणदिवा
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या चिरेबंदी नव्या प्रवेशद्वारावर संस्कृती आणि परंपरा जपणारा लामणदिवा लावला जाणार आहे. हे प्रवेशद्वार ६८ फूट लांब
असून, त्याची उंची ३२ फूट आहे. त्यासाठी जवळपास ७० लाख रुपये खर्च आला असून, हा खर्च स्मार्टसिटी कंपनीने केला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.