Nashik Onion News : स्वत:च्या फायद्यासाठी व्यापाऱ्यांचा बंद; जिल्ह्यातील शेतकरी संघटना प्रमुखांचे मत

Onion News
Onion Newsesakal
Updated on

Nashik Onion News : जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी कांदा लिलाव हे स्वत:च्या फायद्यासाठी बंद ठेवले आहेत. त्यांच्या बंदचा शेतकऱ्यांना यत्किंचितही फायदा होणार नाही, असे परखड मत जिल्ह्यातील शेतकरी संघटनांनी ‘सकाळ’ शी बोलताना व्यक्त केले. (opinion of head of farmer association about onion auction closed nashik news)

व्यापाऱ्यांनी फक्त लिलाव बंद न ठेवता संपूर्ण देशातील बाजार समित्या बंद ठेवाव्यात. विशेष म्हणजे स्वत:चे गोडाऊन चालू ठेवून हा कुठला बंद झाला, असा प्रश्नही त्यांनी व्यापाऱ्यांना उद्देशून केला आहे.

जिल्ह्यातील शेतकरी संघटनांशी साधलेला संवाद....

"राज्यात कांद्याचे दर चार वर्षांतील नीचांकी पातळीवर आले आहेत. ऐन सणासुदीच्या काळात नाशिक जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी कांदा लिलाव बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय योग्य नाही. केंद्र सरकार येणारे २०२४ च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ग्राहक वर्गाचे हित जोपासत आहे. त्याला व्यापाऱ्यांनीही हातभार लावल्याचे दिसून येते." - शंकरराव ढिकले, कार्याध्यक्ष, शेतकरी संघटना, नाशिक

Onion News
Nashik Onion News : जिल्ह्यातील 542 व्यापाऱ्यांवर कारवाईचा बडगा; दुसऱ्या दिवशीही बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट

"व्यापाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी मुंबई, दिल्लीत जाऊन बैठका घ्याव्यात. शेतकऱ्यांना वेठीस धरुन काय उपयोग. लिलाव बंद करून गोडाऊन सुरु ठेवले आहेत. वाढीव दराचा फायदा घेण्‍याच्‍या हेतूनेच हा निर्णय घेतला आहे. त्‍यामुळे या निर्णयाला आमचा पाठिंबा नाही. मागण्‍या योग्‍य आहेत. पण वेळ चुकली. आमदार, खासदार व मंत्र्यांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे." - भारत दिघोळे, संस्थापक अध्यक्ष, कांदा उत्पादक संघटना

"व्यापाऱ्यांच्या मागण्या योग्य असल्या तरी त्यांनी ऐन सणासुदीच्या काळात बाजार समिती बंद ठेवणे अयोग्य आहे. आता फक्त शेतकऱ्यांची अडचण झाली आहे. कांद्याची निर्यात सुरु ठेवून व्यापाऱ्यांनी फक्त शेतकऱ्यांना वेठीस धरलेले दिसते. स्वत:चा फायदा करून घेण्यासाठीच हा बंद आहे." - संदीप जगताप, प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

Onion News
Onion Traders Protest : राज्यातील व्यापारी 26 नंतर बंदमध्ये सहभागी होणार! लिलाव बंदचा कांदा व्यापाऱ्यांचा निर्णय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()