Nashik Godavari Aarti : पुरोहित संघास गोदाआरतीचा निधी देण्यास विरोध : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

वाराणसीच्या धर्तीवर नाशिकमध्ये गोदावरी नदीची आरती सुरू करण्यासाठी राज्य सरकारने पहिल्या टप्प्यात ११ कोटी ६६ लाख रुपये निधी मंजूर केला आहे.
Godavari Mahaarti
Godavari Mahaartiesakal
Updated on

नाशिक : वाराणसीच्या धर्तीवर नाशिकमध्ये गोदावरी नदीची आरती सुरू करण्यासाठी राज्य सरकारने पहिल्या टप्प्यात ११ कोटी ६६ लाख रुपये निधी मंजूर केला आहे.

मात्र, आरती कुणी करावी याविषयीचा वाद दिवसेंदिवस वाढतच चालला असून, गंगा गोदावरी पुरोहित संघाला निधी देण्यास दीपक कुलकर्णी यांनी विरोध केला आहे. (Opposition to Funding of Godavari Aarti to Purohit Sangh Letter to District Collector nashik news)

जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या नावे कुलकर्णी यांनी यासंदर्भात निवेदन दिले आहे. त्यानुसार, पुरोहित संघ हा धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत नसलेला संघ आहे.

संघाचे पदाधिकारी या ठिकाणी व्यवसाय करत असल्याने गोदाआरतीचा निधी मागणीचा त्यांचा दावा वैयक्तिक स्वार्थासाठी असल्याचे दिसून येते. या संस्थेत एकच पदाधिकारी असून, त्यांना अधिकार बहाल केलेले नाहीत.

या प्रकल्पातूनही वैयक्तिक लाभ व्हावा यासाठी त्यांनी हा दावा केल्याचा आरोप कुलकर्णी यांनी आपल्या निवेदनाद्वारे केला आहे. गोदाआरती ही सर्व समाजाची आहे. त्यात सर्वांना समान प्रतिनिधित्व असायला हवे.

त्यामुळे एका संघाकडे हा प्रकल्प देणे बेकायदेशीर ठरेल, असेही त्यांनी पत्रकात म्हटले आहे. रामतीर्थावरील महापालिकेच्या वस्त्रांतर गृहाचे भाडेही थकविले आहे. त्यामुळे वैयक्तिक स्वार्थासाठी जागेचा वापर करणाऱ्या संस्थेला हा अधिकार देवू नये.

या ठिकाणाचे स्वामित्व संघाकडे नाही. त्यामुळेही संघाचा दावा हा बिनबुडाचा असल्याचे दिसून येते. गोदाआरती हा प्रकल्प नोंदणी झालेल्या तसेच उद्देश समाविष्ट असलेल्या संस्थेला अथवा सार्वजनिक न्यासाला देणेच सयुक्तिक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Godavari Mahaarti
NMC Tax Recovery : नाशिक शहरातील 44 हजार थकबाकीदारांना नोटिसा

१८ फेब्रुवारीला भव्य आरती

गोदावरी नदीच्या जन्मदिनानिमित्त येत्या १८ फेब्रुवारीला भव्य आरती सोहळा आयोजित करण्यात आला आहे. दुपारी १२ वाजता ही आरती होईल. त्यानंतर कीर्तन, भजन व महाप्रसादाचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले आहे. गोदाआरतीचा हा शुभारंभच मानला जात आहे.

"यजुर्वेद संस्थेत असताना भ्रष्टाचार केला म्हणून दीपक कुलकर्णी यांना कायमस्वरूपी निलंबित केले आहे. तसेच इतर प्रकरणावरून त्यांच्याविरोधात विविध पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. याचा राग मनात ठेवून वैयक्तिक द्वेषापोटी ही व्यक्ती आमच्या विरोधात दोषारोप करतात. गंगा गोदावरी पुरोहित संघ हा १९५२ रोजी अ-२२ या क्रमांकाने धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत आहे. दीपक कुलकर्णी हे बिनबुडाचे आरोप करतात. राहिला विषय वस्त्रांतर गृहाचा तर महापालिका आणि पुरोहित संघाची अनेकदा बैठक पार पडली आहे. सर्वसामान्य जनतेसाठी हे सभागृह असल्याने त्याचा गैरवापर होण्याचा प्रश्नच येत नाही. गोदाआरती व्हावी यासाठी अनिकेत शास्त्री यांनी पुरोहित संघाचे पहिले पत्र राज्य सरकारला दिले होते. त्यामुळे यापूर्वी आम्हीच आरती करत होतो. आजही करत आहोत आणि यापुढेही करत राहणार, यात काही शंका नाही."

-सतीश शुल्क, अध्यक्ष (पुरोहित संघ, नाशिक)

Godavari Mahaarti
Nashik Onion News : केंद्राच्या पथकाकडून बांधावर येत कांदा पाहणी; 3 गावांत शेतकऱ्यांशी साधला संवाद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.