Nashik News : पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी 3 जागांचा पर्याय; पंचवटीतील जागेची करणार पाहणी

राष्ट्रीय युवा दिनानिमित्त भाजपतर्फे नाशिकमध्ये आयोजित युवा संमेलनाच्या कार्यक्रमास देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत.
Option of 3 places for PM Modi meeting nashik news
Option of 3 places for PM Modi meeting nashik newsesakal
Updated on

Nashik News : राष्ट्रीय युवा दिनानिमित्त भाजपतर्फे नाशिकमध्ये आयोजित युवा संमेलनाच्या कार्यक्रमास देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत.

त्यादृष्टीने जिल्हा यंत्रणा सतर्क झाली असून, केंद्रीय सुरक्षा यंत्रणेसह जिल्हाधिकारी जलज शर्मा हे स्वतः गुरुवारी (ता. २८) पंचवटीतील तीन जागांची पाहणी करणार आहेत.(Option of 3 places for PM Modi meeting nashik news)

स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त १२ जानेवारीला राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो. भाजपतर्फे नाशिकमध्ये युवा महोत्सवाचे आयोजन केले आहे. या माध्यमातून पंतप्रधान मोदी शक्तिप्रदर्शन करणार असून, लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ वाढविला जाणार आहे.

महोत्सवानिमित्ताने जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी बुधवारी (ता. २७) शहरातील तपोवनातील साधुग्राम, निलगिरी बाग आणि मोदी मैदानाची पाहणी करून सुरक्षेच्या दृष्टीने आढावा घेतला. आता पीएमओ कार्यालयातील केंद्रीय समिती नाशिकमध्ये येत असून, समिती देखील या जागेची पाहणी करून जागेची निवड करणार आहे.

या मेळाव्यासाठी सुमारे दहा ते बारा हजार युवक उपस्थित राहण्याची शक्यता असून, राज्याचे भाजपचे सर्व मंत्री या सभेला उपस्थित राहतील. त्यामुळे पंतप्रधानांच्या सुरक्षेबरोबरच मंत्र्यांची सुरक्षाव्यवस्था, शहरातील वाहतूकव्यवस्था, तसेच सभेच्या ठिकाणी करावयाचे बंदोबस्ताचे नियोजन याचा या वेळी आढावा घेण्यात आला.

Option of 3 places for PM Modi meeting nashik news
Nashik News : किलोभर लसूणसाठी 300 रुपये; सप्टेंबरपासून आवक घटली

या संमेलनाची जबाबदारी ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. येत्या दोन दिवसांत गिरीश महाजन नाशिकमध्ये येऊन आढावा घेणार आहेत. यापूर्वी म्हणजे २०१९ मध्ये भाजपच्या महाजनादेश यात्रेचा समारोप मोदींच्या उपस्थितीत नाशिकमध्ये मोदी मैदानावर करण्यात आला होता.

मोदी मैदानावरच सभेची तयारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नाशिकमधील पहिली सभा पंचवटीतील मोदी मैदानावरच झाली होती. त्यामुळे यंदाही हीच जागा सभेसाठी अनुकूल मानली जाते. ओझर विमानतळावर पंतप्रधानांचे आगमन झाल्यानंतर तेथून हेलिकॉप्टरने ते विभागीय क्रीडासंकुल येथे त्यांचे आगमन होईल.

तेथून सभेच्या ठिकाणी ते पोचतील अशा पद्धतीने नियोजन करण्यात येत आहे. साधुग्रामच्या जागेबाबतही विचार सुरू असून, निलगिरीबागेत हेलिपॅड उभारण्याबाबत या वेळी चर्चा करण्यात आली. केंद्रीय समिती या जागांची पाहणी करून अंतिम निर्णय घेणार आहेत.

Option of 3 places for PM Modi meeting nashik news
Nashik News : आंतरजातीय, आंतरधर्मीय जोडप्यांना संरक्षण; प्रत्येक जिल्ह्यात विशेष कक्ष स्थापणार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()