Nashik Citylinc Bus News : सिटीलिंक’कडून वाहक पुरवठादार ठेकेदार कंपनीला काम सुरू करण्याचे आदेश

Citylinc
Citylincesakal
Updated on

Nashik Citylinc Bus News : शहर बससेवा तब्बल पाच वेळा बंद पडल्याच्या पार्श्वभूमीवर वाहक ठेकेदारांना चेकमेट देण्यासाठी सिटीलिंक कंपनीकडून आणखी एका वाहक पुरवठादार ठेकेदार कंपनीला कार्यारंभ आदेश दिले आहे.

यानिमित्ताने संपामुळे वारंवार बंद पडणारी सेवा नियमित सुरू राहील, असा दावा करण्यात आला आहे. (Order from Citylink to carrier supplier contractor company to start work nashik news)

वाहक ठेकेदाराने नियमित वेतन न केल्याने तब्बल पाच वेळा वाहकांनी संप पुकारला. त्यामुळे सेवेवरचा नाशिककरांचा विश्वास उडू लागला. मागील महिन्यात झालेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर सिटीलिंक कंपनी प्रशासनाने नवीन वाहक पुरवठादार नियुक्त करण्याचा निर्णय घेतला. विद्यमान वाहक पुरवठा दराचे काम मॅक्स सिक्युरिटीज ॲन्ड सर्व्हिसेस कंपनीचे आहे.

आता नागपूरच्या युनिटी सर्व्हिसेस कंपनीकडून १०० बससाठी १६९ वाहक पुरविले जाणार आहेत. नाशिक रोड डेपोतून सुटणाऱ्या बसवर वाहक पुरवठा करण्याचे काम या कंपनीचे राहील.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Citylinc
Nashik Citylinc Bus : प्रवाशांचे हाल टाळण्यासाठी सिटीलिंकचे ‘चेकमेट’; नाशिककरांना मनस्ताप

दोन्ही वाहक पुरवठा ठेकेदारांच्या वाहकांनी संप पुकारल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून दुसऱ्या पुरवठादाराला वाहक पूर्वी बंधन करण्यात आले आहे.

सप्टेंबरपासून नाशिक रोड डेपोतील बस नवीन वाहक पुरवठादारांना उपलब्ध होतील. सध्या महापालिकेच्या २५० बस रस्त्यावर धावतात. त्यातील दीडशे बसमध्ये वाहक पुरवण्याचे काम मॅक्स ठेकेदार कंपनीकडे, तर १०० बसवर वाहक पुरवठा करण्याचे काम युनिटी कंपनीकडे राहणार आहे.

Citylinc
Nashik Citylinc Electric Bus: इलेक्ट्रिक बस संचलनासाठी प्रस्ताव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()