Nashik ZP News : जिल्ह्यातील ग्रामसेवकांच्या दिव्यांग प्रमाणपत्राची पडताळणी; जि. प. ग्रामपंचायत विभागाचे आदेश

ग्रामविकास अधिकारी संजय पाटील (दिव्यांग) वर्ग ३ या संवर्गाच्या प्रारूप ज्येष्ठता सूचीत दिव्यांग प्रमाणपत्र कालबाह्य झालेल्या ग्रामविकास अधिकाऱ्यांची बदली चांगलीच गाजली.
zp nashik
zp nashikesakal
Updated on

Nashik ZP News : ग्रामविकास अधिकारी संजय पाटील (दिव्यांग) वर्ग ३ या संवर्गाच्या प्रारूप ज्येष्ठता सूचीत दिव्यांग प्रमाणपत्र कालबाह्य झालेल्या ग्रामविकास अधिकाऱ्यांची बदली चांगलीच गाजली. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यासाठी एक महिन्याचा ‘अल्टिमेटम’ देण्यात आला आहे. (Order of Gram Panchayat Department Verification of Disability Certificate of Gram Sevak in District nashik news)

ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ यांनी जिल्ह्यातील सर्व तालुका गटविकास अधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. कालबाह्य झालेले दिव्यांग प्रमाणपत्र व अल्पदृष्टी असताना चारचाकी वाहन चालवत असलेल्या ग्रामविकास अधिकारी संजय पाटील यांच्या बदली प्रकरणी इगतपुरी तालुक्यातील आरती दिव्यांग सेवाभावी संस्थेने मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, ग्रामविकासमंत्री महाजन, आमदार बच्चू कडू यांच्याकडे तक्रार केली होती.

त्यावर, जिल्हा परिषदेने विविध विभागांतर्गत कार्यरत असलेले दिव्यांग अधिकारी/कर्मचारी यांच्या समस्या व अडीअडचणीचे निराकरण करण्याकरिता गत महिन्यात जिल्हा परिषदेत बैठक घेतली होती. बैठकीत जिल्हा परिषद अंतर्गत काही कर्मचारी हे बनावट दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे विविध सोयी-सुविधा व सवलतींचा लाभ घेत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

zp nashik
Nashik ZP News: जिल्हा परिषद खरेदी करणार 6 नवीन इलेक्ट्रिक वाहने

त्या अनुषंगाने संबंधितांच्या दिव्यांग प्रमाणपत्रांची पडताळणी होण्याबाबत व बनावट दिव्यांग प्रमाणपत्र सादर केलेल्या कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करण्याची मागणी बैठकीत दिव्यांग संघटनेने केली. यासाठी आपल्या गटातील कार्यरत असलेले सर्व दिव्यांग विस्तार अधिकारी (पं.), ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक यांना एक महिन्याच्या आत त्यांचेकडील दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे ऑनलाइन दिव्यांग प्रमाणपत्र व युनिक दिव्यांग आयडी (UDID) कार्ड प्राप्त करून घेण्याबाबत सूचित करण्यात यावे.

तसेच, सदर ऑनलाइन दिव्यांग प्रमाणपत्र व युनिक दिव्यांग आयडी कार्डची साक्षांकित प्रत कार्यालयामार्फत सादर करावी. दिव्यांग प्रवर्गातील कर्मचाऱ्यांकडे ऑनलाइन दिव्यांग प्रमाणपत्र व युनिक दिव्यांग आयडी (UDID) कार्ड नसल्यास व त्यामुळे या संदर्भात भविष्यात काही तक्रारी अथवा समस्या उद्‍भवल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ही त्या संबंधित कर्मचारी व कार्यालय प्रमुख यांची राहणार असल्याचे पत्रात नमूद केले.

या पत्रामुळे आता दिव्यांग प्रमाणपत्र घेऊन बदलीचा लाभ घेतलेल्या सर्व ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांना दिव्यांग प्रमाणपत्राची पडताळणी करावी लागणार आहे. या पडताळणीच्या आदेशामुळे ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

zp nashik
Nashik ZP News : जिल्ह्यातील शाळांमध्ये मुख्यमंत्र्यांचे पत्राचे वाचन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.